एक कळी… !! || EK KALI MARATHI KAVITA ||
एकदा वेलीवरची कळी
उगाच रुसुन बसली
काही केल्या कळेना
फुगून का ती बसली
बोलत नव्हती कोणाला
पाना मागे लपुन बसली
हसत नव्हती कशाला
अबोल होऊन बसली
एकदा वेलीवरची कळी
उगाच रुसुन बसली
काही केल्या कळेना
फुगून का ती बसली
बोलत नव्हती कोणाला
पाना मागे लपुन बसली
हसत नव्हती कशाला
अबोल होऊन बसली
न कळावे मनाला काही
तुझे हे भाव सखे
तु रुसताना ओठांवरती
हळुवार ते एक हास्य दिसे
कसे समजावे डोळ्यांना ही
ते पाहतात ती तुच असे
रागावलेल्या कडां मध्ये ही
माझे चित्र का अंधुक दिसे
एक तु आणि एक मी
सोबतीस एक सांज ती
विखुरली ती सावली
कवेत घ्यायला रात्र ही
अबोल तु निशब्द मी
बोलते एक वाट ती
सोबतीस आज ही
मागते एक साथ ती
कुठे असेल अंत
मनातील विचारांचा
एक घर एक मी
आणि या एकांताचा
भिंती बोलतील मला
संवाद हा कशाचा
आरशातील एक चित्र
शोध हा स्वतःचा
मायेच घर म्हणजे आई
अंधारातील दिवा म्हणजे आई
किती समजाव या शब्दाला
सार विश्व म्हणजे आई
चुकल ते समजावणारी आई
योग्य मार्ग दाखवणारी आई
आपल्या ध्येयाकडे चालताना
खंबीरपणे बरोबर उभी ती आई