एकदा नक्की बघा ..😊
कविता
ती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
जणू ओढ पहाते
ती झुळूक उगा सांजवेळी
गंध पसरवून जाते
प्रत्येक पाऊल ध्येयाच्या वाटेवरती असताना .!!तू किती वेळा पडलास !!! याचा विचार करू नकोस .!! किती वेळा उभा राहिलास याचाही विचार करू नकोस ..!! चालणाऱ्या मार्गावरती कुठे कोणासाठी थांबत बसू नकोस ..!!! कोण काय म्हणत आहे..!!! हे ऐकत बसू नकोस !!! ..
इथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडूदे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजूदे ..!!
तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे
तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे
सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे
राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे
कोणती ही मनास चिंता
कोणती ही आठवण आहे
बदलून गेल्या चेहऱ्यास आता
कोणती नवी ओळख आहे
कोणता हा रंग त्याचा
कोणती नवी वाट आहे
पाहू तरी कुठे आता
सारे काही नवे आहे
अलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट
नकोच आता भार आठवांचा
नकोच ती अधुरी नाती
नकोच ती सावली आपुल्यांची
नकोच त्या अधुऱ्या भेटी
बरेच उरले हातात त्या
रिक्त राहिली तरीही नाती
डोळ्यातल्या आसवांना विचारे
वेदनेची गोष्ट ती कोणती
सांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का
“मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही