शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!

शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!
क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!!
तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !!
शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !!
सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !!
नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!
सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!
पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली!
कवितेतल्या त्या जगात मग, चिंब भिजत राहीली!!
समीर नजर चुकवून गेला हे त्रिशाने पाहिलं. ती काहीच न बोलता समोर असलेल्या आकाशला बोलू लागली. पण तिची नजर समीर तिच्यापासून दूर जात आहे याकडेच होती.मनात कित्येक विचार करत होती.
“आज कित्येक वर्षांनंतर समीर भेटला. पण मला तो माझा समीर वाटलाच नाही. मला टाळून तो कधीच गेला नव्हता. पण आज कदाचित मी दुसऱ्याच समीरला भेटले. जो मला पाहून निघून गेला. “
‘मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं !! त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता येत नाही..!!या आठवणी कधी नकळत मनात समावल्या, तर कधी आवर्जून आठवणीत ठेवल्या ..!!
ओळख ..!!
नकोच आता भार आठवांचा
नकोच ती अधुरी नाती
नकोच ती सावली आपुल्यांची
नकोच त्या अधुऱ्या भेटी
बरेच उरले हातात त्या
रिक्त राहिली तरीही नाती
डोळ्यातल्या आसवांना विचारे
वेदनेची गोष्ट ती कोणती