पाऊस आठवांचा..!
इथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडूदे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजूदे ..!!
इथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडूदे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजूदे ..!!
नकोच आता भार आठवांचा
नकोच ती अधुरी नाती
नकोच ती सावली आपुल्यांची
नकोच त्या अधुऱ्या भेटी
बरेच उरले हातात त्या
रिक्त राहिली तरीही नाती
डोळ्यातल्या आसवांना विचारे
वेदनेची गोष्ट ती कोणती
“मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही
“न उरल्या कोणत्या भावना
शेवट असाच होणार होता
वादळास मार्ग तो कोणता
त्यास विरोध कोणता होता
राहिल्या तुटक्या काहीं आठवणी
त्यास आधार काहीच नव्हता
पापण्यात साठवून ठेवण्यास
कोणताच अर्थ उरला नव्हता