जगणे..!!

कधी आयुष्य जगताना
थोड वेगळ जगुन पहावं
येणार्‍या लाटांच्या
थोड विरुध्द जाऊ द्यावं

श्वासांचा हिशोब तर होईलच
पण प्रत्येक श्वासात
खुप जगुन पहावं
कधी रडताना तर कधी हसताना
मन मोकळं करुन जावं

आयुष्य

आयुष्याचा हिशोब
काही केल्या जुळेना!
सुख दिल वाटुन
हाती काही उरेना!

दुखाच्या बाजारात
दाखल कोणी होईना!
गिर्‍हाईक मात्र त्याला
काही केल्या येईना!