दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,
आई || कथा भाग १० || Story || Marathi ||
"हॅलो !! हा मेघा बोल ना !!" "मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??"
आई || कथा भाग ९ || Mother Daughter Story ||
शीतल घाईघाईत एअरपोर्टवर येते , लवकरात लवकर कोणती फ्लाईट आहे का यासाठी विचारणा करते. "सॉरी मॅम , पण फ्लाईटला अजून दोन तास तरी लागतील. "
आई || कथा भाग ८ || Mother|| Daughter || Story ||
शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती. "समीर !!" आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला. "आई ??"
आई || कथा भाग ७ || मराठी कथा || Story ||
दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे अस झालं होत. ती ऑफिसमधून लगबगीने येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयार करू लागते. रात्रीच जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो
आई || कथा भाग ६ || मराठी कथा || Marathi Story ||
"शीतल !! एवढ्या सकाळी कॉल केलास !! सगळं ठीक आहेना ??" "हो समीर !! सगळं ठीक आहे !! त्रिशा उठली नाही का झोपेतून अजून ??" "नाही !! नाही उठली अजून !! अक्च्युली ती रात्रभर झोपलीच नाही!! जागीच होती!! थोडा वेळ झोप लागलीच तर लगेच दचकून उठायची आणि रडायला लागायची !! पहाटे ४ला आईने तिला तिच्याकडे घेऊन गेली तेव्हा कुठे शांत झोपली. " " रात्रभर जागी होती !!" शीतल शांत आवाजात विचारतं होती. "हो!! पण आता काही टेन्शन नाहीये !! झोपली आहे आता शांत !! मी आता थोड्या वेळाने ऑफिसला निघतोय !! आई घेईन काळजी तिची !! खरतर माझ्यापेक्षा आईकडेच जास्त राहते ती. सतत आईच्या मागे रांगत रांगत फिरत असते ती !! काल तुझ्याशी बोललो ते मग इथेच माझ्याजवळ राहिली !! " शीतल शांत राहिली. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त समीर सांगेन ते ऐकत होती. तिलाही समीरला सांगायचं होत की तीही रात्रभर त्रिशाच्या आठवणीत झोपली नाही.
आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kavita ||
फ्लॅटवर संध्याकाळी काम सगळं संपवून येताच तीने लगबगीने समीरला फोन लावला. "समीर !! " "शीतल !! आलीस ऑफिसमधून ?" "हो आत्ताच आले. !!" शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला. " शीतल !! काही प्रोब्लेम आहे का ??" शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली. " नाही रे !! काही प्रोब्लेम नाहीये !! तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता." "बरं बरं !! "
आई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||
"शीतल काही विचारायचं होत !! " "विचार ना !!" "पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??" "तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! " "पण ती राहील तुझ्याशिवाय !!" "तिला राहावं लागेल !!" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. "समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!" "पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! "