नको अबोला नात्यात आता
की त्यास त्याची सवय व्हावी
अबोल भाषेतूनी एक आता
गोड शब्दाची माळं व्हावी

नको अबोला नात्यात आता
की त्यास त्याची सवय व्हावी
अबोल भाषेतूनी एक आता
गोड शब्दाची माळं व्हावी
राहिले काहीच नसेन तेव्हा
माझा तिरस्कार ही करू नकोस
तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात
एक छोटी जागा मात्र ठेव
न कळावे तुला कधी
शब्दांन मधील भाव सखे
मन ओतले त्यातुन तरी
अबोल तुझ न प्रेम दिसे
मी लिहावे किती सांग तरी
प्रेम हे का शुन्य असे
एक ओढ मझ भेटण्याची
मनी तुझ्या का आज दिसे
वहीचं मागच पान
तुझ्या नावानेच भरलं
कधी ह्रदय कधी क्षण
कुठे कुठे कोरलं
मन मात्र हरवुन
सांगायलाच विसरलं
डोळ्यातलं ते प्रेम
तुलाच नाही कळलं