क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु काढत रहातात !! एकांतात माझ्याशी उगा, का भांडत रहातात??
क्षण सारें असेच, जीव लावून जातात !! परतून येण्याचे का? वचन देऊन जातात!!
मागे वळून पाहता , दूर का भासतात ?? डोळे बंद करता, जवळ का येतात ??