चालताना आपल्याला भूक लागते, तहान लागते आपण क्षणभर शांत बसतो , खाऊन घेतो आणि पुन्हा पुढच्या वाटेवर चालायला लागतो. तेव्हा आपण गरज म्हणून आपल्या सोबत ठेवतो त्या वस्तू म्हणजे पाणी, खाण्यासाठी थोडे पदार्थ. तसच काहीस आपण यशाकडे वाटचाल करताना आपल्याला गरज असते ती आपल्याला चालवत ठेवणाऱ्या एखाद्या वस्तूची. जी कोणत्याही स्वरूपात असेल.
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||
या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुलै १९६७ वार मंगळवार आणि द्वादशी हे सगळं या तारखेत आज्जीने सांगितलं तस जुळून आल आणि आईचा वाढदिवस त्यानंतर १८ जुलैला साजरा होऊ लागला.
सावरून घेता मी स्वतः || Sawarun Love Poem marathi ||
क्षण वाटे तो रेंगाळला , मिठीत जेव्हा तुझ्या रहावे !! नकोच कोणती गोष्ट ती, ज्यात तू नी मी नसावे !! बहरून जणू रात्र यावी, चांदण्यात त्या मी फिरावे !! अलगद मग चंद्रासही , तुझ्या प्रेमाचे रंग द्यावे !!
हळूवार तू लाजता || Haluwar Tu Lajata || Marathi Poems ||
हलके ते हात, हातात आज घेणे!! नकळत तो स्पर्श, मनास त्या बोलणे !! क्षणात या सहज, क्षण विरून जाणे !! तुझ बोलता नकळत, बहरून आज जाणे !!
मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||
वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!
ओल्या वाटेवरती || olya Vatevarati || Beautiful Marathi Poems ||
सांग सखे कूठे ती वेळ, तुझ्या मिठीत थांबून जावी !! नसावी कोणती ओढ त्यास, तुझीच सोबत असावी !! कधी उगाच भेटावी, कधी सहज बोलावी !! सखी तू आभास जणू, माझ्यात मला शोधावी !!
ओढ ती अनामिक || odh Ti Anamik || Marathi Love Poem ||
बरसतात कित्येक सरी, चिंब मी भिजते !! भिजल्या त्या मिठीत माझ्या, उगा तुला शोधते !! सांग कसे समजावू मना, ना कोणा ऐकते !! कोऱ्या कागदावर सहज ते , चित्र तुझे रेखाटते !!
lockdown आणि खुप सारा वेळ !!
घरात सगळे एकत्र असताना कशाला हवा मोबाईल ?? द्या तो ठेवून बाजूला, करा टीव्ही बंद आणि आपल्या घरच्या लोकांसोबत मजा करा मिळालेला हा वेळ. कित्येक दिवस वडलांशी मनसोक्त बोलणंच झालं नव्हतं मग बोला त्यांना , मुलांना वेळच देता येत नव्हता , मग द्या त्यांना वेळ, आपण नेहमी म्हणतो की आमचा काळ खूप मस्त होता , मग तोच काळ पुन्हा आणा आपल्या घरात, तासनतास गप्पा मारा , गाण्याच्या भेंड्या खेळा, पत्ते, सापशिडी, बुद्धिबळ असे कित्येक खेळ आहेत जे आपण आपल्या घरच्या सोबत खेळू शकतो, सांगा आपल्या मुलांना की आम्ही या मोबाईल शिवाय आनंदी होतो. कारण आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगत होतो.