दिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.
