एकट वाटेन ज्यावेळी
साथ नसेल कोणाची
साद घाल भावा
साथ मिळेल मित्रांची
मैत्री तुझी नी माझी
साथ कशाला कोणाची
आठवणींत आपल्या
साथ होती मैत्रीची
एकट वाटेन ज्यावेळी
साथ नसेल कोणाची
साद घाल भावा
साथ मिळेल मित्रांची
मैत्री तुझी नी माझी
साथ कशाला कोणाची
आठवणींत आपल्या
साथ होती मैत्रीची
धुंध त्या सांजवेळी
मन सैरभैर फिरत
आठवणींना वाट मिळे
डोळ्यात दिसत
तु आहेस ही जाणीव
तु नाहीस हा भास
मनही हल्ली गंमत करत
“शब्द हे विचार मांडतात
शब्द हे नाते जपतात
शब्द जपुन वापरले
तर कविता बनतात
शब्द अविचारी वापरले
तर टिका बनतात
प्रेम मला कधी कळलचं नाही
बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही
मनातल्या कोपर्यात कधी कोण दिसलच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .
तिचं हसणं कधी पाहिलंच नाही
त्याच रहस्य कधी जाणलंच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही
तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.
तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते.
तिला कळावे
मला कळावे
शब्द मनातील असे
शब्द तयाचे
शब्द न राहिले
हासु उमटे जिथे
जीवनातल्या या क्षणी
आज वाटते मनी
हरवले गंध हे
हरवी ती सांजही
क्षण न मला जपले
ना जपली ती नाती
दुर त्या माळावरी
होत आहे मावळती
“हो मित्रा, मी बार्शीचा
आहे ती भगवंताची
माझ्या अंबरीष राजाची
माझ्या आठवणींच्या क्षणांची,
वाढलो इथेच घडलो इथेच
संस्कार माझे बार्शीचे