गरिबाच्या बुडावर काठ्या !! श्रीमंताच्या पायी सत्ता आली !! गरीब भुकेने मेला !! श्रीमंतांची मजा मस्ती करून झाली !! तुझ्या अन्नछत्राच्या खाली , कित्येक गरीब जेवून गेली !! आणि तुझ्याच दारात म्हणे, रोगराई हसहसत खेळून गेली !!
ध्येय || Dhey Marathi Inspirational Quotes ||
वाचू नये गाथा यशाच्या , पुढच्या ध्येयाकडे पहावं !! नवे मार्ग ,नवी दिशा , पुन्हा जिद्दीने चालावं !! कधी विरुद्ध , कधी प्रवाहात, स्वतःला आव्हान द्यावं !! कधी दिवसा , कधी रात्री, फक्त ध्येय समोर दिसावं !!
शर्यत कथा भाग ८ || Sharyat Story Part 8 ||
पाहता पाहता शर्यतीचा दिवस उजाडला. सखा सकाळी उठून सगळं आवरू लागला. शांता कशीतरी उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला उठताच येत नव्हतं. तिची ती धडपड पाहून सखा तिच्या जवळ जात म्हणाला. "बसून राहा शांता, तापेचा जोर खूप वाढलाय
शर्यत || कथा भाग ७ || Sharyat Story || Part 7 ||
सकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्याला पाहून आप्पा जवळ येत म्हणाले. "व्हा सखा ! बरं झालं लवकर आलास !! आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये !! " आप्पा सोबत तीन चार माणसे अजून होती त्यांच्याकडे पाहत आप्पा म्हणाले , "तयार आहात ना रे सगळे !! " सगळे एका सुरात म्हणाले. "हो !!" सखा फक्त पाहत राहिला.
हुरडा पार्टी || Hurada Party ||
शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा होते. अशावेळी एखाद्या झाडाखाली ही हुरडा पार्टी करण्याची मजाच वेगळी असते. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जमिनीत एक आपटी केली जाते ज्याला सरळ भाषेत एक छोटासा खड्डा म्हणतात. तर ही आपटी केल्यानंतर त्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या पेटवून विस्तव तयार केला जातो.
शर्यत (कथा भाग ६) || Sharyat STORY PART 6 ||
"हे बघा !! तापेचा जोर वाढलाय !! अशक्तपणा आहे !! " "काल बेशुद्ध पडली होती !! तेव्हापासून असच आहे बघा !! एका वैद्यांना दाखवलं होत, तेव्हा कुठ शुद्धीवर आली. थोड बरं वाटलं पण पुन्हा ताप आली." "बरं बरं !!" वैद्यबुवा सगळं ऐकून एक मात्रा शांताच्या ओठांवर ठेवत म्हणाले. "हे बघा !! वयामूळ शरीर साथ देत नाहीये !! पण एक औषध देतो !! ते दर एक तासाला दुधात टाकून त्यांना देत राहा !!" बुवा औषधाची डबी सखाकडे देत म्हणाले. "बरी होईल ना ती ??" सखा अगदिक होत म्हणाला.
कातरवेळी || kataraveli || कविता || प्रेम
सहज लिहावं, नी कविता व्हावी !! कातरवेळी , जणू ती दिसावी !! क्षणात माझ्या, मिठीत यावी !! चारोळी ती, जणू पूर्ण व्हावी !! सहज पहावं, नी प्रेमात पाडावी !! सखी नजरेतून, मज का बोलावी !! माझ्यातील मला, जणू ती मिळावी !! उगाच का मग, कुठे ती शोधावी ??
शर्यत ( कथा भाग ५) || Sharyat katha bhag 5 ||
"तो तिकडं पाणी भरतोय !! तुझ्या इलाजाचे पैसे नव्हते त्याच्याकडे, म्हणून करतो म्हणाला काम !!" शांताला हे कळताच तिला रडू कोसळलं. आपल्या पदराला मुठीत आवळून आपला हुंदका तिने दाबला आणि पटकन उठली, तरातरा चालत ती विहीर जवळ आली. "कशासाठी एवढी कष्ट ?? मी जगावं म्हणून ना ?? पण तुमच्या जीवाचा तरी विचार करा !!" शांता सखाच्या जवळची कळशी घेत म्हणाली. "शांता मग करायचं तरी कोणासाठी सांग ना ?? हे शरीर देवाने एवढं टिकवल ते उगाच नाही !! जा बस तिथे माझं झालाच आहे !! " " नाही ! मीपण मदत करणार तुम्हाला !!" "नाही म्हटलं ना !! जा !!"