Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » मराठी लेख

lockdown आणि खुप सारा वेळ !!

Category मराठी लेख
lockdown आणि खुप सारा वेळ !!

Content

  • १. वाचन
  • २. कला.
  • ३. स्वतःमध्ये बदल घडवा,
  • ४. लिखाण
  • ५. बागकाम
  • ६. नामजप , अध्यात्मिक विकास,
  • ७. जुन्या आठवणीतले खेळ,
Share This:

सध्या जगामध्ये आलेल्या महामारीमुळे सर्वानाच घरी बसण्याची वेळ आलेली आहे. आणि तो नाईलाज झाला आहे. पण या परिस्थितीमुळे एक मात्र गोष्ट मागच्या वर्ष दीड वर्षात खूप मिळाली आणि ती म्हणजे मुबलक वेळ. मला ते पुस्तक वाचायला खूप आवडतं पण काय करू वेळच मिळत नाही. असे खूपदा आपण जवळ जवळ सगळ्यांच्याच तोंडून ऐकतो. ऐकलही असेल. पण गेल्या वर्षभरापासून ही सबब आता देऊन चालणार नाही हे मात्र खर. या lockdown मूळे आपल्या सगळ्यांना me Time खूप मिळाला. त्याचा कित्येकांनी योग्य वापर केला, तर काहींनी फक्त घड्याळाकडे पाहत दिवस घातले. आपल्या आवडीनिवडी काळाच्या ओघात , किंवा जबाबदाऱ्या सांभाळत कुठे राहून गेल्या कळालच नाही. अशाच आपल्या आवडी निवडी , राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा सुरू करायला काय हरकत आहे. नाही का ?? उगाच सकाळ संध्याकाळ टीव्ही समोर बसून इतके रुग्ण वाढले , अस झाल तस झालं ऐकत बसण्यात काय अर्थ आहे ?? त्यामुळे आपला फोकस थोडा स्वतःकडे आता वळवू आणि lockdown चे पालन करत स्वतःमध्ये बदल घडवू, थोड शिकू, थोड वेगळं जगू , आपल्यातल्या सकारात्मकतेला आपल्या चांगल्या गोष्टी शिकण्यास सुरुवात करायल लावू, तर मग पाहुयात तरी आपण आपल्या या इतक्या मिळालेल्या वेळेचा उपयोग तरी कसा करायचा ..

१. वाचन

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपली ही सुंदर आवड बहुदा विसरूनच गेलो होतो. रोज ठरवत होतो की उद्यापासून सुरुवात करू , आज कमीत कमी दहा तरी पाने वाचू . पण नेमक आपल्या व्यस्त कामात आपल्याला ते कधी जमलंच नाही. धूळखात पडून राहिलेलं ते पुस्तक हातात घ्यायची हीच खरी वेळ आहे नाही का ? गेल्या दीड वर्षात किती निवांत वेळ मिळाला असेल ?? पुस्तक वाचत वाचत आपल्यातल्या चांगल्या ऊर्जेला पुन्हा जागृत करायचं. घरात lockdown मध्ये बसून सार जग या पुस्तकाच्या दुनियेत फिरून यायचं. एखाद्या पुस्तकातील , कादंबरी मधील पात्राशी रोज बोलायचं. भेटायचं आणि त्यात रमून जायचं. मग ते पुस्तक संपलं की पुन्हा नवीन पुस्तक , नवीन पात्र नवे जग . मग बघा तुमचा हा वेळ किती सुंदर जाईल. तुम्ही कादंबरी वाचू शकता, ज्ञानवर्धक पुस्तक वाचू शकता. मग बघा जेव्हा तुम्ही या कोरोना नंतरच्या जगात याल तेव्हा हे जग नक्कीच तुम्हाला वेगळं दिसेल.

२. कला.

सर्वात सुंदर विषय म्हणजे कला. विविध कला, चित्रकला , पाककला, गायनकला, आणि भरपूर काही. राहून गेलं होत ना हे शिकायचं? मग वेळ कशाला उगाच वाया जाऊ द्यायचा. जी कला आपली शिकायची राहू गेली होती तिला अवगत करायला करा सुरुवात. तुम्हाला चविष्ट पदार्थ बनवायची इच्छा आहे तर शिका पाककला, हल्ली यूट्यूब , फेसबुक अश्या कित्येक साईट्स आहेत ज्यावर तुम्हाला जगभरातील कित्येक वेगवेगळे पदार्थ करण्याची रेसिपी दाखवली जाते. त्या रेसिपी शिकण्याचा प्रयत्न करा. चित्रकलेची आवड आहे तर घ्या ब्रश हातात आणि सुरुवात करा, गायन शिकायचं आहे तर रियाज करायला सुरुवात करा, सध्या ऑनलाईन गायन क्लासेस सुद्धा सुरू झाले आहेत ते जॉईन करा. धूळ खात पडलेली गिटार पुन्हा वाजवायला सुरुवात करा. आपली आवड जपा , बघा मन प्रसन्न होईल.

३. स्वतःमध्ये बदल घडवा,

आयुष्यात कित्येक लोकांना स्वतःकडे पाहायला वेळच मिळत नाही आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा शरीर थकून गेलेलं असतं. विविध आजारांनी घर केलेलं असतं. पण ते होत कशामुळे तर आपण कधीच आपल्याला न दिलेल्या वेळामुळे. पोट खूप सुटलय, तर ठरवा की या lockdown मध्ये मी ते कमी करणारच, एखाद व्यसन जडलय तर त्यापासून मी माझी मुक्तता करणारच, असा निर्धार करा, खरतर lockdown मध्ये दारूच्या दुकानासमोर झालेली गर्दी ही दुर्दैवी होती. कारण हीच ती वेळ होती शरीराला या रोगापासून अजून मजबूत बनवायची. पण आपण धावलो ते व्यसनाकडे. असो पण अशा वाईट गोष्टी बदलण्याची, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची हीच ती वेळ आहे. कारण ऑक्सिजन आज महाग झाला आहे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडावा, खूप दिवसांपासून व्यायाम करण्याची इच्छा होती तर त्याची सुरुवात करा. बघा नक्कीच आपल्यात बदल घडेल आणि तो आपल्याच फायद्याचा असेल.

४. लिखाण

खूप दिवसांपासून तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे , पण क्लासेस, exam’s, ऑफिस यापैकी कोणत्याही कारणामुळे वही आणि पेन हातात घाय्याला वेळ कुठे होता ?? नाही का ? पण आता खूप वेळ मिळाला आहे आणि म्हणावी इतकी शांतता सुद्धा आहे, ना रस्ते वाहतायत ना कोणी बाहेर आहे, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार एवढंच आहे सोबत, मग घ्या हातात वही आणि पेन आणि करा सुरुवात लिहायला. एखादी कविता लिहा , मनातले विचार लिहा , ऑनलाइन ब्लॉग्ज लिहा , लोकांशी संवाद साधा , पण व्यक्त व्हा जी कित्येक दिवसांची इच्छा अपूर्ण राहिली होती ती पूर्ण करा. अगदी मनसोक्त लिहा.

५. बागकाम

घराच्या अंगणात एक सुंदर बाग असायला पाहिजे होती अशी तुमची इच्छा होतेच ना ?? पण सकाळी लवकर जायचं आणि रात्री उशिरा यायचं यामुळे ते कधी जमलंच नाही. नकळत त्या जास्वंदीच्या झाडाला आलेलं फुल सुद्धा आपण पाहिलं नाही. मग आता ही वेळ एखादी सुंदर बाग तयार करायला घालवण्यात काय वाईट आहे !! बागकाम करण्या इतकं सुंदर दुसरं कुठलच काम नाही असं मला वाटतं, कारण तिथे हळूच गुलाबाच फुल उमलताना पाहण्यात वेगळीच मजा असते. आणि जेव्हा तुम्ही आज बाग सजवाल आणि पुन्हा एकदा हे जग पळू लागल्यावर आणि त्यात तुम्हीही धावू लागल्यावर जेव्हा केव्हा थकून घरी याल , तेव्हा त्या बागेतील सुंदर उमलेली फुले त्याच्या सुगंधाने तुम्हाला नक्कीच आनंद देतील. मग करा सुरुवात एक सुंदर बाग तयार करायला.

६. नामजप , अध्यात्मिक विकास,

घाईगडबडीत देवाला पाय पडून जाताना फक्त माझ्या सोबत रहा एवढंच म्हणणं असतं आपलं. कधी वाटतं ना की नामजप करत आपण तल्लीन होऊन जावं, हा अध्यात्मिक ग्रंथ त्याच पठण करावं, मग वेळ ती कशाची पहायची अध्यात्माच्या सावलीत माणूस नक्कीच सकारात्मक होतो. त्याच्यातील राग, लोभ, द्वेष निघून जातो. माणूस संयमी आणि शांत होतो. त्याच्यातील त्याला शोधण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे अध्यात्म. तुम्हाला खूप दिवस झाले इच्छा होती दासबोध वाचण्याची ,मग करा सुरुवात, ज्ञानेश्वरी पठण करण्याची हीच ती योग्य वेळ आहे . कारण आजूबाजूला इतक्या निगेटिव्ह गोष्टी चालत असताना अध्यात्माच्या सानिध्यात जाणं म्हणजे स्वतःला गुरू चरणी नतमस्तक केल्या सारखं आहे. तुम्हाला अध्यात्माची आवड असेल तर ती आवड नक्की जोपासा देवाच्या सानिध्यात तुम्ही कधीच एकटे पडणारा नाहीत.

७. जुन्या आठवणीतले खेळ,

घरात सगळे एकत्र असताना कशाला हवा मोबाईल ?? द्या तो ठेवून बाजूला, करा टीव्ही बंद आणि आपल्या घरच्या लोकांसोबत मजा करा मिळालेला हा वेळ. कित्येक दिवस वडलांशी मनसोक्त बोलणंच झालं नव्हतं मग बोला त्यांना , मुलांना वेळच देता येत नव्हता , मग द्या त्यांना वेळ, आपण नेहमी म्हणतो की आमचा काळ खूप मस्त होता , मग तोच काळ पुन्हा आणा आपल्या घरात, तासनतास गप्पा मारा , गाण्याच्या भेंड्या खेळा, पत्ते, सापशिडी, बुद्धिबळ असे कित्येक खेळ आहेत जे आपण आपल्या घरच्या सोबत खेळू शकतो, सांगा आपल्या मुलांना की आम्ही या मोबाईल शिवाय आनंदी होतो. कारण आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगत होतो.

अश्या कित्येक गोष्टी आहेत ज्या आपण या lockdown मध्ये करू शकतो, कारण आपण घरी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, सरकार , प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करतं आहेत, आणि त्यात आपला सहभाग १००% असायला हवा. पण नुसतं घरात बसूनही चालणार नाही हेही तितकंच खरं आहे. कारण नक्कीच यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच अगदी मला कोंडून ठेवलं आहे ही भावना आपल्या मनात येता कामा नये. म्हणूनच आपण आपला वेळ हा या सगळ्या गोष्टी करण्यात घालवू शकतो.

उद्या सगळं नीट झाल्यावर मागे वळून पाहताना आपण आपल्या मनाला म्हणायला नको की हे वर्ष माझे वाया गेले. तर अस वाटायला हवं की मी यामध्ये खूप काही शिकलो आणि या वेळेनेही आम्हा सर्वांना त्याची किंमत सांगितली.

तर मित्रांनो तुम्हीही या वेळेचा उपयोग कशाप्रकारे केला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा!! धन्यवाद.

✍️© योगेश खजानदार

Tags मराठी लेख संग्रह मराठी सुंदर सुविचार संपादकीय लेख मराठी सुंदर लेख मराठी lockdown आणि खुप सारा वेळ !!

RECENTLY ADDED

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
gold buddha figurine in gold and red floral dress
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
woman in black long sleeved shirt
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
brown framed eyeglasses on a calendar
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

Dinvishesh

दिनविशेष २७ मार्च || Dinvishesh 27 March ||

१. अब्राहम गेंसेर यांनी रॉकेलचे पेटंट केले. (१८५५) २. अँड्र्यू रँकिंग यांनी लघवीच्या भांड्याचे पेटंट केले. (१८५६) ३. मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार पंडीत भीमसेन जोशी यांना देण्यात आला. (१९९२) ४. सुहरतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६८) ५. भारताने यशस्वीरित्या लो ऑर्बिटल Satellite ला ballistic missile टेस्ट मध्ये ध्वस्त केले आणि भारत "स्पेस पॉवर" म्हणुन ओळखला जाऊ लागला. (२०१९)
cheerful indian girlfriend near boyfriend in nature

एक वचन || EK VACHAN || MARATHI PREM KAVITA ||

तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात ..
श्रीगुरुचरित्र अध्याय १४

श्रीगुरुचरित्र अध्याय २३ || Gurucharitr Adhyay 23 ||

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे विनवीत । पुढील कथाविस्तारत । निरोपावें दातारा ॥ १ ॥ सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अखिल लीळा । तोचि विप्र प्रकट करिता झाला । वांझ महिषी वर्ते ज्याचे गृहीं ॥ २ ॥
photo of man holding umbrella walking beside building while its raining

आठवणी || AATHVANI || MARATHI POEM||

हळुवार त्या पावसाच्या सरी कुठेतरी आजही तशाच आहेत तो ओलावा आणि त्या आठवणी आजही मनात कुठेतरी आहेत चिंब भिजलेले ते क्षण आजही पुन्हा भेटत आहेत
Dinvishesh

दिनविशेष २९ जून || Dinvishesh 29 June ||

१. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२००१) २. फ्रेहरर फ्रँकेंथुर हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९११) ३. अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वकप जिंकला. (१९८६) ४. छत्तीसगढ येथे पोलिसांनी १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. (२०१२) ५. सेशेल्सला ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७६)

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest