Leap Day (लिप इअर) || MARATHI INFO ||

Share This:

दिनांक २९ फेब्रुवारी हा दिवस लिप डे म्हणून ओळखला जातो. दर ४ वर्षांनी येणाऱ्या या दिवसाचे वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व आहे. या दिवसाचा थेट संबंध हा आपल्या कालगणनेशी येतो.साधारणतः एका वर्षात ३६५ दिवस असतात असे आपण सर्वसामान्य लोक मानतो. परंतु पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे लागतात. या कालगणनेनुसार दर चार वर्षांनी आपले कॅलेंडर १ दिवस पुढे सरकत जाते, ते टाळण्यासाठीच लिप डे सामाविष्ट केला जातो. आणि लिप इअर हे कोणते ?? तर ज्या वर्षाला ४ ने पूर्ण भाग जातो ते वर्ष लिप इअर असते. ही संकल्पना पूर्वी ज्युलियन सिझर ने आणली म्हणूनच याला ज्युलियन कॅलेंडर असेही नाव देण्यात आले. पण याही कॅलेंडर नुसार पाहिले तर दर चार वर्षात आपण ४८ मिनिटे अधिक सामाविष्ट करतो आणि हेच टाळण्यासाठी आपण दर ४०० वर्षात ३ लिप वर्ष रद्द करतो, यातही जर शतक वर्ष असेल तर त्याला ४०० ने भाग जायला हवा. ही संकल्पना पोप ग्रेगरी यांनी आणली म्हणून याला ग्रेगोरियन कॅलेंडर असेही म्हटले जाते.