Share This:

 आपल्यातल्या कित्येकांना वाटतं राहत की आपला एक स्वतःचा ब्लॉग असावा. पण त्याची सुरुवात कशी करायची; हे कित्येक लोकांना माहीतच नसतं. म्हणूनच हा विचार मनातच राहून जातो. अशाच माझ्या काही मित्रांसाठी, ज्यांना खरंच ब्लॉग लिहिण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी “How To Write An Awesome Blog??” “ब्लॉग कसा लिहावा??” नावाचे हे नवे सत्र सुरू करतो आहे . यामध्ये अगदी सोप्या भाषेत ब्लॉग कसा लिहावा , त्याची सुरुवात आणि पुढे लक्षात घ्यावयाचे मुद्दे; मांडणार आहे.  तर मग सुरू करूयात आपल्या नव्या विषयाला. 

“ब्लॉग कसा लिहावा ??” [ Part 1]

१.विषय (subject)

ब्लॉगचा विषय कोणता असावा हा सर्वात मुख्य मुद्दा असतो. कोणतंही लिखाण हे कोणत्या ना कोणत्या विषयास अनुसरून असतं. म्हणूनच ब्लॉगचा विषय कोणता असावा हे मनास नक्की ठरवल पाहिजे. त्यावरून आपण आपल्या ब्लॉगविषयी रूपरेषा ठरवू शकतो. जेव्हा आपण विशिष्ट एका पुस्तकाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे माहीत असतं की नक्की विषय कोणता आहे आणि त्याची रूपरेषा काय आहे. तसच ब्लॉग विषयी पण आहे. समजा आपण एखादा मराठी कवितेचा ब्लॉग लिहित असू , तर तो त्या ब्लॉगचा विषय होतो, आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारे लिखाण करावं हेही स्पष्ट होत.

२. उद्देश (Motive)

 सहसा आपण कोणतंही काम सुरू करतो तेव्हा आपल्या मनात त्याबद्दल काहीतरी उद्देश नक्की असतो. तोच सर्वात प्रमुख मुद्दा ब्लॉग लिहिताना सुद्धा लक्षात घ्यायला हवा. आपण नक्की ब्लॉग कशाबद्दल लिहिणार आहोत. वाचकांनी किंवा प्रेक्षकांनी नक्की आपल्या ब्लॉगकडे काय म्हणून पहावं. हे लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. समजा आपल्याला एखादा entertainment ब्लॉग काढायचा आहे; ज्यामध्ये वाचकांचे निखळ मनोरंजन झाले पाहिजे, तर मग त्या दृष्टीने त्याविषयी आपले पुढचे मुद्दे लिहिता आले पाहिजेत. म्हणूनच जेव्हा ब्लॉगचा मूळ उद्देश नक्की करतो, तेव्हा आपल्याला आपला ब्लॉग कसा असावा हे कळण्यास मदत होते.

३. Content / language

Content म्हणजे नक्की काय तर ब्लॉग लिहायला आपल्याकडे कोणत्या गोष्टी असाव्या हे पाहणं. आता तुम्ही म्हणाल ते आपण पहिल्या मुद्द्यांमध्ये पाहिलं आहेच ना!! मग अजून काय हवं ?? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे language (भाषा ). तुम्ही नक्की कोणत्या भाषेत ब्लॉग लिहिणार आहात यावरून तुमच्या ब्लॉगची एक विशिष्ट कॅटेगरी( वर्गवारी) ठरते. त्यासाठी तुम्हाला त्या भाषेवर जास्तीत जास्त प्रभुत्व मिळवणं गरजेचं असतं. तसेच आपला ब्लॉग इतर कोणत्या विषयाचा असेल, for example music, विज्ञान किंवा अजून काही, तर अशावेळी भाषे सोबतच तुम्हाला त्याविषयी चांगलं ज्ञान असायला हवं. खरतर हा विषय खूप लोक लक्षात घेत नाहीत आणि मग पुढे ब्लॉग चालू ठेवताना त्यांना त्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तस पाहायला गेलं तर प्रत्येक ब्लॉगचा content हा त्या ब्लॉगच्या विषयावर अवलंबून असतो. फोटोग्राफर साठी फोटोज्, music साठी त्याचं सखोल ज्ञान. त्यामुळेच ब्लॉग सुरू करताना content काय लागू शकतो हे विचारात घेणं गरजेचं असतं. 

४. Title (ब्लॉगचे नाव)

ब्लॉगला नाव काय असाव हेही नीट विचारपूर्वक ठरवणं गरजेचं असतं. आपल्या ब्लॉगला ते साजेस असावं लागतं. जेव्हा आपण एखाद्या विज्ञान या विषयावर ब्लॉग लिहितो तेव्हा ब्लॉगचे नावही तसेच त्या विषयाला अनुसरून असायला हवे. जर ब्लॉग विविध विषयावर आधारित असेल तर सर्वांना मिळते जुळते नाव द्यायला हवे. कारण ते नाव आपल्या ब्लॉगची ओळख ठरते. 

५. प्लॅटफॉर्म 

ब्लॉगसाठी लागणारा content काय असावा हे एकदा कळलं की पुढचा मुद्दा येतो प्लॅटफॉर्म. तर प्लॅटफॉर्म म्हणजे नक्की काय ?? तर आपण जे लिहिणार आहोत किंवा आपण जे दाखवणार आहोत त्यासाठी लागणारा एक मंच. तसे ब्लॉगचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे लिखित स्वरूपात लिहिलेला किंवा चित्र स्वरूपात लिहिलेला ब्लॉग ज्याला आपण website ही म्हणू शकतो. आणि दुसरा येतो vlog म्हणजे व्हिडिओ स्वरूपात तयार केलेला ब्लॉग. ज्यामध्ये travel Blogs, informative blogs येतात. ज्यामध्ये ब्लॉगर स्वत: व्हिडिओ स्वरूपात ते मांडतात . ब्लॉगसाठी आपण WordPress , Wix अशा प्लॅटफॉर्मची निवड करू शकतो. तर vlog साठी यूट्यूब किंवा स्वतःची एखादी वेबसाईट काढून त्यावर सुरुवात करू शकतो.तेव्हा ब्लॉग सुरू करताना प्लॅटफॉर्म नक्की कोणता असावा हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं असतं.

http://www.wix.com

६. Account 

वैयक्तिक स्वतःची वेबसाईट तयार करून जर ब्लॉग लिहिणार असाल तर हा मुद्दा लक्षात नाही घेतला तरी चालेल. पण जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर आपला ब्लॉग लिहिणार असू तेव्हा त्या प्लॅटफॉर्म मध्ये आपलं account असणं फार गरजेचं असतं. Account क्रिएट करताना हे प्लॅटफॉर्म आपल्याकडून कोणताही शुल्क आकारात नाहीत. त्यामुळे आपण नक्की कशावर आपले अकाउंट काढणार आहोत हेही ठरवावं. WordPress ,blogger, Wix , YouTube etc. त्यामुळे सर्वप्रथम अकाउंट काढणं महत्त्वाचं आहे.

७. Subdomain, (blogger , WordPress ,Wix )

जेव्हा आपण एखादा ब्लॉग सुरु करतो तेव्हा त्याचा एक subdomain तयार होतो. तो subdomain त्या ब्लॉगची खरी ओळख असते. जसे की wordpress वर जर तुम्ही ब्लॉग लिहिणार असाल तर subdomain नाव निवडण्याची संधी wordpress देत. For example, जर आपण xyz नावाने जर ब्लॉग सुरु केला असेल आणि त्याचा subdomain आपण xyz निवडला असेल तर wordpress वर xyz.wordpress.com ही आपली ब्लॉगची URL तयार होते. जिथे आपण आपल्या ब्लॉगच्या पोस्ट्स वाचू शकतो. त्यामुळे हे subdomain name नीट विचारपूर्वक निवडायला हवं. त्यानंतर आपल्या सर्व ब्लॉगिंग account बद्दलच्या प्रक्रिया पूर्ण होतात. 

८. Posts( updates)

वरील सर्व मुद्द्यांचा विचार झाल्यानंतर वेळ येते ती ब्लॉग लिहायला सुरुवात करण्याची. सध्याचा ब्लॉगिंग जगात WordPress हा सर्वात गाजलेला प्लॅटफॉर्म आहे. तर त्यावर नक्की कसं लिहितात ते पाहू. 
  आपल्या फ्री account वरून WordPress वर आपल्याला एक dashboard दिसेल.  आणि उजव्या बाजुला वर कोपऱ्यात Write साइन दिसेल, त्यावर क्लिक करून आपण ब्लॉग लिहायला सुरुवात करू शकतो. यामध्ये नक्की पोस्ट्स कशा असाव्यात हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपण या प्लॅटफॉर्मच्या वेबसाईटवर जाऊन लिहू शकतो किंवा त्यांचे मोबाईल application ही आहेत त्यावरून आपण ब्लॉग updates करू शकतो. 

http://www.wordpress.com
http://www.blogger.com

९. लोकांपर्यंत ब्लॉग पोहचवणे!! Share

ब्लॉग लिहिला आणि त्याला वाचक जर कोणी नसतील तर तो लिहिण्या मागचा उद्देश साध्य होत नाही. तसेच जेव्हा आपण सुरुवातीला फ्री ब्लॉग लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला स्वतः लोकांपर्यंत पोहचाव लागतं. लोकांना ब्लॉग पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी प्रोत्साहित कराव लागतं. यामध्ये सोशल मीडिया आहे, मेसेजेस आहेत अशा विविध मार्गाने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो.

१०. Keep Blogging (लिहीत राहा!! व्यक्त होत राहा!!)

ब्लॉगची सुरुवात झाल्या नंतर त्याला up to date ठेवणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे ब्लॉग लिहीत राहणं किंवा त्याविषयी updates देत राहणं गरजेचं आहे. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा ब्लॉग लिहीन किंवा update करणं केव्हाही चांगलं. त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल आपला वाचक वर्ग आपल्याशी नेहमी कनेक्ट राहील आणि एक प्रवाह सुरू झाल्यावर तो वाचण्याची किंवा पाहण्याची मजा वाचकांना येईल. त्यामुळे ब्लॉग लिहीत राहण गरजेच आहे.

तर हे काही मुद्दे आहेत जे आपल्याला ब्लॉग लिहिण्याच्या अगदी सुरुवातीला माहीत असण गरजेच आहे. आणि नक्कीच ही आपली सुरुवात आहे. पुढील लेखामध्ये आपण ब्लॉगिंग विषयी अजून महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या या वेबसाईटला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला सर्व ब्लॉगिंग विषयीचे मुद्दे वाचण्यास मिळतील.

पुढील लेखामध्ये आपण फ्री ब्लॉग आणि त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत .. सबस्क्राईब नक्की करा .. आणि ब्लॉग लिहिण्यास सुरुवात नक्की करा !!