आपलं नात छान असावं
  तिळगुळा सारखं गोड असावं
  रुसव्याला तिथे स्थान नसावं
  आनंदाचं इथे घर असावं!!

 आपलं नात अबोल नसावं
  गुळात मिळालेला गोडवा असावं
  तिळगुळ खाऊन मस्त असावं
  फक्त गोड शब्दांचे मोती असावं!!

 आपलं नात एक आठवण असावं
  ओठांवरच हास्य असावं
  अतूट एक बंधन असावं
  कधीही न विसरण्या चे वचन असावं!!

  ✍ योगेश खजानदार
SHARE