तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते.

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||

उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून दुपारची वेळ, एक निवांत मिळालेला क्षण आणि पुढे काय करावं हा प्रश्न. मग लॅपटॉप ऑन करून त्यावर एखादा चित्रपट पहायचं ठरलं. मनाशी तस ठरवलं सुद्धा. पण मन कुठेतरी वेगळीकडेच हरवून गेले होत. सगळं काही ट्राय करून बसलो, मित्रांशी फोनवर बोललो, चॅटिंग केली.

गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||

गणपती यायच्या महिना आधी एका छापखान्यात जाऊन ५- १० रुपयांचे पावती पुस्तक आणायचे , मग सगळ्या मित्रांनी ठरवायचं कुठे पट्टी मागायची ,कधी जायचं , कमीत कमी किती पट्टी जमा करायची, सगळं काही ठरवलं जायचं. मग कोणी ५ रुपये द्यायचे , कोणी ११ रुपये तर कोणी २१ , ओळखीतल कोणी असेल तर लगेच ५१ रुपये द्यायचे. सगळ्या पट्टीचा हिशोब एकाच मित्राकडे असायचा.

तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||

woman in black long sleeved shirt

चालताना आपल्याला भूक लागते, तहान लागते आपण क्षणभर शांत बसतो , खाऊन घेतो आणि पुन्हा पुढच्या वाटेवर चालायला लागतो. तेव्हा आपण गरज म्हणून आपल्या सोबत ठेवतो त्या वस्तू म्हणजे पाणी, खाण्यासाठी थोडे पदार्थ.  तसच काहीस आपण यशाकडे वाटचाल करताना आपल्याला गरज असते ती आपल्याला चालवत ठेवणाऱ्या एखाद्या वस्तूची. जी कोणत्याही स्वरूपात असेल.

वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||

brown framed eyeglasses on a calendar

या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुलै १९६७ वार मंगळवार आणि द्वादशी हे सगळं या तारखेत आज्जीने सांगितलं तस जुळून आल आणि आईचा वाढदिवस त्यानंतर १८ जुलैला साजरा होऊ लागला.

lockdown आणि खुप सारा वेळ !!

woman in green and white stripe shirt covering her face with white mask

घरात सगळे एकत्र असताना कशाला हवा मोबाईल ?? द्या तो ठेवून बाजूला, करा टीव्ही बंद आणि आपल्या घरच्या लोकांसोबत मजा करा मिळालेला हा वेळ. कित्येक दिवस वडलांशी मनसोक्त बोलणंच झालं नव्हतं मग बोला त्यांना , मुलांना वेळच देता येत नव्हता , मग द्या त्यांना वेळ, आपण नेहमी म्हणतो की आमचा काळ खूप मस्त होता , मग तोच काळ पुन्हा आणा आपल्या घरात, तासनतास गप्पा मारा , गाण्याच्या भेंड्या खेळा, पत्ते, सापशिडी, बुद्धिबळ असे कित्येक खेळ आहेत जे आपण आपल्या घरच्या सोबत खेळू शकतो, सांगा आपल्या मुलांना की आम्ही या मोबाईल शिवाय आनंदी होतो. कारण आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगत होतो.

हुरडा पार्टी || Hurada Party ||

हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा होते. अशावेळी एखाद्या झाडाखाली ही हुरडा पार्टी करण्याची मजाच वेगळी असते. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जमिनीत एक आपटी केली जाते ज्याला सरळ भाषेत एक छोटासा खड्डा म्हणतात. तर ही आपटी केल्यानंतर त्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या पेटवून विस्तव तयार केला जातो.

बाप्पा निघाले गावाला || GANPATI BAPPA MORAYA ||

तुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील. मनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल. पुढच्या वर्षी मी लवकर येईल !! आणि तुम्हा सर्व भक्तांच्या भेटीची ओढ मलाही राहिलं !!