मी मात्र

वाटा शोधत होत्या मला
मी मात्र स्वतःतच गुंतलो होतो
बेबंद वार्‍या सोबत
उगाच फिरत बसलो होतो

वळणावर येऊन सखी ती
सोबत येण्यास तयार होती
मी मात्र परक्याच्या घरात
उगाच भांडत बसलो होतो

उठावं

“अस्तित्वाच्या जाणिवेने
लाचार जगन का पत्कराव
स्वाभिमानाने ही तेव्हा
स्वतःही का मरावं
नसेल त्यास होकार मनाचा
मग शांत का बसावं

आयुष्य

आयुष्याचा हिशोब
काही केल्या जुळेना!
सुख दिल वाटुन
हाती काही उरेना!

दुखाच्या बाजारात
दाखल कोणी होईना!
गिर्‍हाईक मात्र त्याला
काही केल्या येईना!

मैत्री

एकट वाटेन ज्यावेळी
साथ नसेल कोणाची
साद घाल भावा
साथ मिळेल मित्रांची

मैत्री तुझी नी माझी
साथ कशाला कोणाची
आठवणींत आपल्या
साथ होती मैत्रीची

1 2 3 4