एक पुतळा फुटला !! आणि अचानक मनातलं बोलला …! निषेध ..!!! पण कसला ?? पुतळा फुटला म्हणून !! अरे !! पण तो पुतळा जातीपातीत विभागला कोणी त्याला शोधा !! नाटकी हार !! नाटकी नमस्कार करणाऱ्या त्या ढोंगी माणसांना शोधा !!

मातीचा कण नी कण बोलतो
गाथा इथे पराक्रमाची
शिवाजी महाराज आणि
निडर शंभू राजांची
शस्त्र, शास्त्र आणि शौर्य
यांचं एक रूप राजं माझे
हाती भवानी तलवार
ध्येय हिंदवी स्वराज्य
आणि वादळाशी झुंज
असे आहेत राजं माझे
वाऱ्यास अभिमान एवढाच काही
डौलात फडकत्या तिरंग्यास पाही
क्षणोक्षणी त्यास मग स्पर्शून जाई
आपुल्यास साऱ्या गुणगान गाई
वाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची
सांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची
उजाड वाटे घरटे तुझे मग सलगी कर तू स्वतःशी
गडबड आणि गोंधळ कसला विचार तुझ्या मनाशी
एक बहिण म्हणुन आता
मला एवढंच सांगायचं आहे
रक्षण करणाऱ्या माझा भावाला
थोडसं बोलायचं आहे
किती वरणु सौंदर्य तुझे
किती सांगू साहस
किती बोलू भाव तुझे
किती शब्द ही निरागस
“हक्काने भांडावं असं
कोणीतरी हवं असतं
हक्काने बोलावं असं
कोणीतरी जवळ लागतं
कोणीतरी अलगद आपल्या
जीवनात तेव्हा येत असतं
मित्र असे त्या नात्यास
नाव ते मग देत असतं