“मातीचा कण नी कण बोलतो
गाथा इथे पराक्रमाची
शिवाजी महाराज आणि
निडर शंभू राजांचीवाऱ्यासवे घुमते आजही
वाणी थोर महात्म्यांची
संत तुकाराम आणि
बोली ज्ञानोबा माऊलींचीअखंड तेवत राहते ज्योत
महापुरुषांच्या विचारांची
टिळक,शाहू,फुले आणि
कित्येक थोर व्यक्तींचीपानाफुलात बहरते इथे
संस्कृती मराठी माणसांची
सांगते मराठी बाणा आणि
ताकद या महाराष्ट्राची ..!!!”✍️©योगेश खजानदार
Category: भारत देश कविता
तिरंगा (२६ जानेवारी )
गणतंत्र दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या भारताचे संविधान लागू झाले. तो दिवस साऱ्या भारतवर्षात प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता , लोकांची सत्ता म्हणून साजरा केला जातो. कित्येक राज्य, कित्येक धर्म , कित्येक जाती एक झाल्या, त्या या तिरंग्या समोर , विविधतेत एकता म्हणतात ते याचसाठी. अशा या भारत देशाचा ध्वज आकाशात डौलात फडकताना एक अभिमान वाटतो त्या वाऱ्यासही , प्रत्येकवेळी नव्याने चैतन्य पसरते त्या आकाशातही, गंध हरवुनी जाते ते फुलंही.. आणि एकजीव होऊन जाते सारे तो राष्ट्रध्वज येता समोरी, अशा या भारतमातेला कितीही वेळा नमन केले तरी पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे वाटते …
वाऱ्यास अभिमान एवढाच काही
डौलात फडकत्या तिरंग्यास पाही
क्षणोक्षणी त्यास मग स्पर्शून जाई
आपुल्यास साऱ्या गुणगान गाईआभाळी एक तेव्हा नवचैतन्य येऊनी
साऱ्या आसमंतात भरून जाऊनी
त्या तिरंग्यास जेव्हा कवेत घेऊनी
आकाश होते ठेंगणे त्याहुनहीउधळले फुल जाणले पाकळ्यांनी
गंध सारे दरवळे चारी दिशांनी
काही थांबले काही रेंगाळूनी
तिरंग्यात जणू हरवले गंधाळूनीशब्द भारावले ओठावर येवूनी
गर्व होता उर येई भरुनी
तिरंग्यास कित्येक वंदन करुनी
या भारतमातेस नतमस्तक होऊनीतेव्हा, आठवणीत यावे कित्येक क्षणही
शहीद जवान आणि त्यांचे आयुष्यही
मातीत घडले कित्येक महापुरुषही
तेच खरे या तिरंग्याची शानहीवाऱ्यास अभिमान एवढाच काही
डौलात फडकत्या तिरंग्यास पाही✍️©योगेश खजानदार
भारत माता की जय !!
वंदे मातरम् !
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!