प्रेमाचे कित्येक रंग , मनातले ओठांवर यावे
प्रेम कविता
सांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का
कधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय काय या मनाला तरी
विचारलं मी कित्येक वेळेस
आणि हे मन मला तेव्हा
तुझ्याच प्रेमात घेऊन जातात
स्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे
संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती
सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी
चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी
हळुवार त्या पावसाच्या सरी
कुठेतरी आजही तशाच आहेत
तो ओलावा आणि त्या आठवणी
आजही मनात कुठेतरी आहेत
चिंब भिजलेले ते क्षण
आजही पुन्हा भेटत आहेत
मी वाट पाहिली तुझी
पण तु पुन्हा आलीच नाही
वाटेवरती परतुन येताना
तुझी सोबत भेटलीच नाही
क्षणात खुप शोधताना तुला
स्वतःस मी सापडलो नाही
मी आणि तुझ्यात तो
माझाच मी राहिलो नाही
शोधते मी स्वतःस कुठेतरी
तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते
तुझ्याकडे पाहतंच राहावे
मन का मज ते सांगत राहते
डोळ्यात तुझ्या पाहताच
तुझ्याकडेच का ओढली जाते
मिठीत तुझ्या यावे आज
ती रात्र का बोलत राहते
आठवणींचा समुद्र आहे जणु
तु सतत लाट होऊन का यावीस
कधी मन ओल करुन माझे
तु पुन्हा का परतावी
वार्यासवे कधी वाहताना
मी तुझी वाट त्यास सांगावी
ती प्रत्येक झुळुक तेव्हा
तुझा भास होऊन का यावी