दिनविशेष

दिनविशेष १८ मार्च || Dinvishesh 18 March ||

१. आझाद हिंद सेनेने भारताच्या ईशान्य सिमेचा भाग ब्रिटीश सत्तेचा पराभव करून स्वतंत्र केला. (१९४४)
२. जगातील पहिली सार्वजनिक बस सेवा पॅरिस येथे सुरू करण्यात आली. (१६६२)
३. ग्रीसने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१९२०)
४. असहकार आंदोलन केल्याबद्दल महात्मा गांधी यांना सहा वर्षे तुरुंगवास झाला. (१९२२)
५. नाझी जर्मनीने हंगेरी काबिज केले. (१९४४)

दिनविशेष १७ मार्च || Dinvishesh 17 March ||

१. ब्रिटन आणि नेदरलँड मध्ये व्यापार करार झाला. (१८२४)
२. मुंबई येथे वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. (१९९७)
३. सुनील गावस्कर यांनी टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. (१९८७)
४. कलकत्ता येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ८०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९३)
५. चीनमधील नॅशनल पीपल्स काँग्रेसचे वांग किषान हे उप राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. (२०१८)

दिनविशेष १६ मार्च || Dinvishesh 16 March ||

१. जर्मन सैन्याने झेकोसलोवकिया काबिज केले. (१९३९)
२. इराक आणि सोव्हिएत युनियन मध्ये आर्थिक आणि तांत्रिक करार झाला. (१९५९)
३. सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. (१९९२)
४. ब्रिटीश पंतप्रधान हरोल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला. (१९७६)
५. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शंभर शतक पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. (२०१२)

दिनविशेष १५ मार्च || Dinvishesh 15 March ||

१. फिनलॅडने पहिल्यांदाच महिलांना मतदानाचा हक्क दिला. (१९०७)
२. मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले. (१८२०)
३. गरस्ताझु मेदिसी यांनी ब्राझील राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९७४)
४. मराठी मधील पहिले छापील पंचांग गणपत कृष्णाजी यांनी सुरू केले. (१८३१)
५. टांझानियाने संविधान स्वीकारले. (१९८४)

दिनविशेष १४ मार्च || Dinvishesh 14 March ||

१. एली व्हिटनी यांनी कॉटन जिन मशीनचे पेटंट केले. (१७९४)
२. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट मुंबई येथे प्रदर्शित झाला. (१९३१)
३. सर्बिया आणि तुर्की मध्ये शांतता करार झाला. (१९१४)
४. साहित्य अकादमीची स्थापना दिल्ली येथे करण्यात आली. (१९५४)
५. लियम कोसग्रावे हे आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७३)

Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.