दिनविशेष ११ सप्टेंबर || Dinvishesh 11 September ||

१. आझाद हिंद सेनेने जण गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले. (१९४२)
२. World Wildlife Fund ची स्थापना करण्यात आली. (१९६१)
३. भारतीय सैन्याने लाहोर जवळ बुर्की हे गाव आपल्या ताब्यात घेतले. (१९६५)
४. महात्मा गांधींनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनात सत्याग्रह ही संकल्पना वापरली. (१९०६)
५. इराक आणि सऊदी अरेबियाने नाझी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)

दिनविशेष १० सप्टेंबर || Dinvishesh 10 September ||

१. दुसऱ्या महायुद्धात कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)
२. चीनला लीग ऑफ नेशन्सचे सदस्यत्व मिळाले. (१९१९)
३. ब्रिटिश सैन्य मादागास्कर मध्ये उतरले. (१९४२)
४. लुईगी लुकिनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली. (१८९८)
५. पंजाब राज्याचे विभाजन करण्यात आले, पंजाब आणि हरियाणा असे दोन वेगळे राज्य बनले. (१९६६)

दिनविशेष ९ सप्टेंबर || Dinvishesh 9 September ||

१. कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले. (१८५०)
२. ताजिकिस्तान सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र देश झाला. (१९९१)
३. भारताने स्पेस एजन्सीद्वारा २१ पीएसएलव्ही यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. (२०१२)
४. इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ ,संशोधक जॉन हर्श्चेल यांनी पहिल्यांदा ग्लास प्लेट छायाचित्र घेतले. (१८३९)
५. लक्संबर्गला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१८६७)

दिनविशेष ८ सप्टेंबर || Dinvishesh 8 September ||

१. भारतामध्ये दूरचित्रवाणीवर तंबाखू तसेच तत्सम पदार्थांच्या जाहिराती दाखवण्यास बंदी केल्याचा कायदा करण्यात आल्या. (२०००)
२. अशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना झाली. (१९५९)
३. अल्जेरयाने संविधान स्वीकारले. (१९६३)
४. मसेडोनियाला युगोस्लाव्हिया पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
५. अमेरिकेत गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या चक्रीवादळात ८०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९००)