दिनविशेष ६ डिसेंबर || Dinvishesh 6 December ||

१. फिनलॅड या देशाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९१७)
२. अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली, यामुळे उसळलेल्या दंगलीत १५००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
३. स्पेनने नवीन संविधान स्वीकारले. (१९७८)
४. द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. (१८७७)
५. तुर्कीने सार्वत्रिक निवडणुकीत महिलांच्या मतदानास मान्यता दिली. (१९२९)

दिनविशेष ५ डिसेंबर || Dinvishesh 5 December ||

१. नॅशनल इन्शुरन्स कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९०६)
२. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. (१७९२)
३. सी. एफ. स्कोंबिन यांनी सेलुलोस नायट्रेट एक्स्पलोजीवचे पेटंट केलं. (१८४६)
४. आरोण अल्लेण यांनी फोल्डिंग थिएटर खुर्चीचे पेटंट केले. (१८५४)
५. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्नो यांनी देशातून सर्व डच नागरिकांना हद्दपार केले. (१९५७)

दिनविशेष ४ डिसेंबर || Dinvishesh 4 December ||

१. भारताचे लष्करप्रमुख म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक करण्यात आली. (१९४८)
२. लॉस एंजेलिस टाईम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. (१८८१)
३. भारत पाकिस्तान तिसऱ्या युद्धात ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. (१९७१)
४. जेम्स मॉनरोई हे अमेरिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८१६)
५. गेट वे ऑफ इंडियाचे व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (१९२४)

दिनविशेष ३ डिसेंबर || Dinvishesh 3 December ||

१. पाकिस्तानने भारतावर सैन्य हल्ला केला. (१९७१)
२. इलिनाॅय हे अमेरिकेचे २१वे राज्य बनले. (१८१८)
३. भारतातील भोपाळ मध्ये वायू दुर्घटना घडली, युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथील आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन १४००पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेनंतर काही वर्षात २०,०००हून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. (१९८४)
४. अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८२८)
५. तूर्की आणि अर्मेनियामध्ये शांतता करार झाला. (१९२०)