दिनविशेष २७ जुलै || Dinvishesh 27 July ||

१. पहिल्या प्रवासी जेट विमान डी हॅविलीलॅंड कोमेटचे पहिले उड्डाण झाले. (१९४९) २. रशिया आणि तुर्की मध्ये शांतता करार झाला. (१७१३) ३. सर्व सार्वजनिक ठिकाणे , शासकीय इमारती येथे सिगारेट तसेच तत्सम पदार्थांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. (२००१) ४. इंटरनॅशनल जॉग्राफिकल युनियनची स्थापना करण्यात आली. (१९२२) ५. यांगट्झी जियांग या चीनमधील नदीला आलेल्या पुरात २०००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९३५)

दिनविशेष २६ जुलै || Dinvishesh 26 July ||

१. भारताने पाकिस्तानी सैन्याने कारगिल येथे केलेली घुसखोरी रोखत त्यांना पिटाळून लावले, भारताने कारगिल युद्ध जिंकले, (१९९९) २. न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले. (१७८८) ३. अमेरिकेत पहिल्यांदाच साखर कारखाना सुरू करण्यात आला. (१८३५) ४. नेदरलँड आणि जर्मनी मधील युद्ध संपुष्टात आले. (१९५१) ५. महिलांचा पहिला क्रिकेट सामना गिल्फॉर्ड इंग्लंड येथे झाला. (१७४५)

दिनविशेष २५ जुलै || Dinvishesh 25 July ||

१. श्रीमती प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. (२००७) २. चीन आणि जपान मध्ये युद्ध सुरू झाले. (१८९४) ३. वॉल्टर हंट यांनी पेपर शर्ट कॉलरचे पहिले अमेरीकन पेटंट केले. (१८५४) ४. कॅनडा या देशात आयकर लागू करण्यात आला. (१९१७) ५. जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉन ब्राऊन ही इंग्लंडमध्ये जन्मास आली. (१९७८)

दिनविशेष २४ जुलै || Dinvishesh 24 July ||

१. फ्रान्सने पहिल्यांदाच कॉपीराइट सुरक्षितता कायदा लागू केला. (१७९३) २. गुलामगिरी प्रथा चीलिमध्ये संपुष्टात आली. (१८२३) ३. जगातली पहिली लहान मुलांसाठी रेल्वे सोव्हिएत युनियनने टबिलिसी येथे सुरू केली. (१९३५) ४. अपोलो ११ हे अंतराळयान पृथ्वीवर परतले. (१९६९) ५. महाश्वेता देवी, बंगाली लेखिका यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९७)

दिनविशेष २३ जुलै || Dinvishesh 23 July ||

१. हेपेटायटिस -बी या रोगावरील लसीच्या प्राथमिक वापरास सुरुवात करण्यात आली. (१९८६) २. मुंबईमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण केले, याचेच पुढे आकशावाणीत रूपांतरण करण्यात आले. (१९२७) ३. एलिजाह मॅककॉय यांनी वाफेच्या इंजिनासाठी लागणाऱ्या लुब्रिकेटरचे पेटंट केले. (१८७२) ४. अमेरिकन सैन्याने इटलीमधील पिसावर ताबा मिळवला. (१९४४) ५. पहिले Earth Resources Satellite यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. (१९७२)

दिनविशेष २२ जुलै || Dinvishesh 22 July ||

१. ब्रिटीश सरकार विरुद्ध देशाचे दुर्दैव हा अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. (१९०८) २. क्राव्हेरो लोपेझ हे पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५१) ३. पोलंडमध्ये कमुनिश्ट सत्तेची सुरुवात झाली. (१९४४) ४. वासुदेव बळवंत गोगटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या, यामध्ये सर जॉन हाॅटसन वाचला. (१९३१) ५. प्रणब मुखर्जी हे भारताचे १३वे राष्ट्रपती बनले. (२०१२)