न भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे
कधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा ठाव आहे तरी कुठे
न भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे
कधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा ठाव आहे तरी कुठे
कधी हळूवार वाऱ्यासवे
तुझाच गंध दरवळून जातो
देतो आठवण तुझी आणि
तुलाच शोधत राहतो
उगाच वेड्या मनास या
तुझ्या येण्याची हुरहूर देतो
हळूवार तो वारा कधी
नकळत स्पर्श करून जातो
नकोच आता भार आठवांचा
नकोच ती अधुरी नाती
नकोच ती सावली आपुल्यांची
नकोच त्या अधुऱ्या भेटी
बरेच उरले हातात त्या
रिक्त राहिली तरीही नाती
डोळ्यातल्या आसवांना विचारे
वेदनेची गोष्ट ती कोणती
क्षणिक यावे या जगात आपण
क्षणात सारे सोडून जावे
फुलास कोणी पुसे न आता
क्षणिक बहरून कसे जगावे
न पाहता वाट पुढची कोणती
क्षणाक्षणास गंध उधळीत जावे
कोणी ठेविले मस्तकी उगाच अन
कोणी पायी त्यास तुडवून जावे
अल्लड ते तुझे हसू मला
नव्याने पुन्हा भेटले
कधी खूप बोलले माझ्यासवे
कधी अबोल राहीले
बावरले ते क्षणभर जरा नी
ओठांवरती जणू विरले
अल्लड ते हसू मला का
पुन्हा तुझ्यात हरवून बसले
“मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही
“न उरल्या कोणत्या भावना
शेवट असाच होणार होता
वादळास मार्ग तो कोणता
त्यास विरोध कोणता होता
राहिल्या तुटक्या काहीं आठवणी
त्यास आधार काहीच नव्हता
पापण्यात साठवून ठेवण्यास
कोणताच अर्थ उरला नव्हता
चांदण्यात फिरुनी शोधला चांदोबा
शुभ्र दुधात पाहता हसला लाजरा
पसरून चोहीकडे हरवला तो बावरा
लख्ख प्रकाशाने जणू खुलला तो चांदोबा