Skip to main content

चहा ..☕

अमृत म्हणा , विष म्हणा
काही फरक पडत नाही
वेळेवरती चहा हवा
बाकी काही म्हणणं नाही

सकाळ सकाळ उठल्या उठल्या
याच्या शिवाय पर्याय नाही
पेपर वाचत दोन घोट घेता
स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही

Read More

चेहरा..😊

कोणती ही मनास चिंता
कोणती ही आठवण आहे
बदलून गेल्या चेहऱ्यास आता
कोणती नवी ओळख आहे

कोणता हा रंग त्याचा
कोणती नवी वाट आहे
पाहू तरी कुठे आता
सारे काही नवे आहे

Read More

ओझे भावनांचे…✍️

“नकळत साऱ्या भावनांचे ओझे आज का झाले काही चेहरे ओळखीचे त्यात काही अनोळखी का निघाले बोलल्या भावना मनाशी तेव्हा सारे गुपित उघडे का झाले क्षणभर सोबती हसवून जाता आपलेच का रडवून गेले शोधले खूप उगाच स्वतःस अखेर ते शून्य का झाले साथ आयुष्भर देणारे त्यास मधेच का सोडून गेले क्षणभर हसून पाहिले असता मन थोडे […]

Read More