“थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं
कधी जुन्या अडगळीत
उगाच रमून जाणं!!
धुळीत पडलेल्या त्या फोटोला
अलगद पुसून घेणं
थोड तरी हवं त्या क्षणाना
पुन्हा मागे घेऊन जाणं!!
“थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं
कधी जुन्या अडगळीत
उगाच रमून जाणं!!
धुळीत पडलेल्या त्या फोटोला
अलगद पुसून घेणं
थोड तरी हवं त्या क्षणाना
पुन्हा मागे घेऊन जाणं!!
आशिर्वाद द्यावा , तू आज गजानना!!
परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला!!
तुझे चित्र राहो , मनी या माझ्या सदा!!
विरह हा तो आज , वाटे न यावा पुन्हा !!
विघ्नहर्ता तू , तूच आहेस लंबोदरा!!
तुझे जाणे असे की , पाह तू वळूनी जरा!!
साद कोणती या मनास आज
चाहूल ती कोणती आहे!!
तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब का भिजवत आहे??
आई तुळशी समोरचा दिवा असते
बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
बाबा त्या रांगोळीतला रंग असतात
अचानक कधी समोर तू यावे
बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे
नजरेने सारे मग बोलून टाकावे
मनातले अलगद तुला ते कळावे
इथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडूदे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजूदे ..!!
न मी उरले माझ्यात आता
तुझ्यात जरा शोधशील का ..??
भाव या मनीचे माझ्या तू
नकळत आज ओळखशील का .??
तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे
तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे
सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे
राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे