वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!
क्षण सारें असेच !!! kshan Saare asech || Marathi Poem
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !! रुसव्यात त्याची समजूत, जणु काढत रहातात !! एकांतात माझ्याशी उगा, का भांडत रहातात?? क्षण सारें असेच, जीव लावून जातात !! परतून येण्याचे का? वचन देऊन जातात!! मागे वळून पाहता , दूर का भासतात ?? डोळे बंद करता, जवळ का येतात ??
असे कसे हे || Love POEM ||
वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !! श्वास घ्यावा नुसता !! पण हे जगणे नाही !!
सूर्यप्रकाश || AWESOME MARATHI POEM || Kavita
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !! स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !! असावी पुन्हा नव्याने एक, चालण्याची गती!! उन्ह वारा पाऊस नी काय, नसावी कोणती भीती !!
एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !! मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !! प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !! रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी !!
जिथे मी उरावे !!JITHE ME URAVE KAVITA ||
आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!
कोजागिरी. || KOJAGIRI POEM IN MARATHI ||
चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!! चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी !! लख्ख तो प्रकाश, बोलतो न काही !! हळूवार ती झुळूक, अलगद येऊन जाई!!
राजकारण || POLITICS || MARATHI KAVITA ||
"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसरायचं नाही !!