दिवा || मराठी कविता || Diva || Kavita ||

मंद मंद प्रकाश चहूकडे !! असाच पसरत जावा!!
एक दिवा तो वाती सवे !! अखंड तेवत रहावा !!

कधी देव्हाऱ्यात असताना !! स्वतःस विसरून जावा !!
कधी तुळशी समोर बसताना!! अंगणात त्या शोभावा !!

निरांजन घेता सांभाळून सारे !! तेलासवे जळावा !!
रात्र असावी सोबतीस मग !! अजून खुलून दिसावा !!

चालण्यास तू सज्ज हो || Marathi Motivational Poem ||

शोधता मिळे तो मार्ग !! चालण्यास तू सज्ज हो!!
नकोच किंतू आणि परंतु !! लढण्यास तू सज्ज हो !!

बोलेल वाट परतून जाण्या !! ढाल हाती सज्ज हो !!
होतील वार कित्येक तुझ्यावर !! निडर होण्या सज्ज हो !!

बरसतील त्या सरी अनावर !! भिजुनी जाण्या सज्ज हो !!
प्रखर त्या सुर्यासवे मग !! तळपण्यास तू सज्ज हो!!

मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||

वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !!
हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !!
आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !!
घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !!

कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !!
महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!!
तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !!
घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!