सहवास!! (कथा भाग २) || MARATHI KATHA KAVITA ||
“एकांत मनाच्या तळाशी जणू
माझेच मला का दिसतो आहे
सगळीकडे पसरला तो प्रकाश
पण माझ्याच वाट्यास का अंधार आहे ?? ”
“एकांत मनाच्या तळाशी जणू
माझेच मला का दिसतो आहे
सगळीकडे पसरला तो प्रकाश
पण माझ्याच वाट्यास का अंधार आहे ?? ”
सरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का ??
“सोड !! सोड रे!! अरे राक्षस आहे का कोण आहेस तू!!! ” सुनंदा स्वतःचा हात सोडवत बोलू लागली.
“अरे भाड्या जरा तरी दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की!! वासनेची भूक एवढी कसली रे तुला!!!
ये आजे , श्याम उठतं का नाहीये !! ” सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
“बाळा मी आले रे !! तुझी आई !! उठ ना पटकन!! चल बर आपण वैद्यांकडे जाऊयात!!
आई , तू पण झोप ना!! ” श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला.
“नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच. तुला बरं वाटतं नाही ना!! झोप बर तू !! ” सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली.
थोड्याशा पैशासाठी मला विकणारा माझा बाप पुन्हा गिऱ्हाईक म्हणून आला तर नवल काय वाटून घेऊ मी. आज माझा मुलगा शिकून मोठा व्हावा अस मला वाटत तर यात माझं काय चुकलं?
या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंध राहायचं आहे. इथे लज्जा माझ्यासाठी फक्त शब्द आहे पण तरीही समाजानं सोडून दिलेली लाज हळूच लपवायची आहे.