दिवसा मागून दिवस निघून जात होते, रिझल्टची वेळ जवळ आली होती. पण आकाशला वेगळीच ओढ लागली होती,
“सायली सोबत गप्पा मारताना, तिच्या सोबत बाहेर कुठे असताना मला जणू एक पूर्णत्व येत. कोणतंही टेन्शन असू दे तिचा एक मेसेज तेवढ्यात आला तर सगळं टेन्शन कुठच्या कुठे निघून जात. पण हे तिलाही वाटतं असेलच ना?? तिलाही माझ्याबद्दल त्याच फीलिंग्ज असतील ना ?? उगाच नाही आम्ही दोघे एकमेकांत इतके गुंतून गेलो
