आई || कथा भाग ६ || मराठी कथा || Marathi Story ||

“शीतल !! एवढ्या सकाळी कॉल केलास !! सगळं ठीक आहेना ??”
“हो समीर !! सगळं ठीक आहे !! त्रिशा उठली नाही का झोपेतून अजून ??”
“नाही !! नाही उठली अजून !! अक्च्युली ती रात्रभर झोपलीच नाही!! जागीच होती!! थोडा वेळ झोप लागलीच तर लगेच दचकून उठायची आणि रडायला लागायची !! पहाटे ४ला आईने तिला तिच्याकडे घेऊन गेली तेव्हा कुठे शांत झोपली. ”
” रात्रभर जागी होती !!” शीतल शांत आवाजात विचारतं होती.
“हो!! पण आता काही टेन्शन नाहीये !! झोपली आहे आता शांत !! मी आता थोड्या वेळाने ऑफिसला निघतोय !! आई घेईन काळजी तिची !! खरतर माझ्यापेक्षा आईकडेच जास्त राहते ती. सतत आईच्या मागे रांगत रांगत फिरत असते ती !! काल तुझ्याशी बोललो ते मग इथेच माझ्याजवळ राहिली !! ”
शीतल शांत राहिली. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त समीर सांगेन ते ऐकत होती. तिलाही समीरला सांगायचं होत की तीही रात्रभर त्रिशाच्या आठवणीत झोपली नाही.

आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kavita ||

फ्लॅटवर संध्याकाळी काम सगळं संपवून येताच तीने लगबगीने समीरला फोन लावला.
“समीर !! ”
“शीतल !! आलीस ऑफिसमधून ?”
“हो आत्ताच आले. !!”
शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला.
” शीतल !! काही प्रोब्लेम आहे का ??”
शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली.
” नाही रे !! काही प्रोब्लेम नाहीये !! तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता.”
“बरं बरं !! “

आई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||

“शीतल काही विचारायचं होत !! ”
“विचार ना !!”
“पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??”
“तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! ”
“पण ती राहील तुझ्याशिवाय !!”
“तिला राहावं लागेल !!” शीतल नकळत बोलून गेली.
समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही.
“समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!”
“पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! “

आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||

शीतल लांबुनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्या जवळ केव्हा आले हे तिला कळलं ही नाही.
” थोड बोलायचं होत तुझ्याशी शीतल !! शीतल !!”
शीतल भानावर आली आणि बाबांना म्हणाली.
“बोला ना बाबा !!
“डॉक्टर पाठक यांना भेटलीस ना ??त्यांनी मला सगळं काही सांगितलं !! तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं.”
“बाबा ते ! मी .. मी!! ”
“काही बोलू नकोस शीतल !! Abortion साठी गेलीस तू त्यांच्याकडे !! माहितेय ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते !! अस करता नाही येत ते बाळा !! डॉक्टर पाठक माझे चांगले मित्र आहेत त्यांनी तुझी कशीतरी समजूत काढून तुला घालवून दिल. त्यांनाही हे अनपेक्षित होत !! ”