मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
नकळत मग मी हरवून गेलो , जिथे कोणी शोधणारच नाही !!
नकळत मग मी स्वतःस भेटलो, जिथे कोणास ओळखतच नाही !!
मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
नकळत मग मी हरवून गेलो , जिथे कोणी शोधणारच नाही !!
नकळत मग मी स्वतःस भेटलो, जिथे कोणास ओळखतच नाही !!
विसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण्याची, जाणीव एक आहे !!
“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!
रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!!
कधी बहरावी वेल ती सुंदर, सुगंध दरवळण्यासाठी !!
असावी एक गोड ती आठवण , मनास सुखावण्यासाठी!!
“नकळत जुळले बंध असे हे,
मनासही ते उमजेना !!
नजरेच्या त्या भाषे मधूनी,
बोलल्या शिवाय राहिना!!
नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!
सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!
पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली!
कवितेतल्या त्या जगात मग, चिंब भिजत राहीली!!
ती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
जणू ओढ पहाते
ती झुळूक उगा सांजवेळी
गंध पसरवून जाते
“बोलावंसं वाटलं तरी ,
काय बोलावं , कधीच कळलं नाही!!
समुद्राच्या लाटेने ते मन,
नकळत ओल केलं तरी,
मनास ते कधीच कळल नाही!!
सारा भार त्या अश्रूनवर होता ,
“लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत
माझ्या मनातल्या तुझ्या ते
प्रेमात नकळत पडले आहेत