मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||

वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!

माझी आई || MAJHI AAI || MARATHI POEM ||

अथांग भरलेल्या सागराचे कोणी मोजेल का पाणी त्या सम माझ्या आईचे प्रेम नजरेत दिसते आकाश सारे सामावून घ्यावे मिठीत वारे त्या सम् माझ्या आईचे मन

खंत… || KHANT MARATHI POEM ||

तो दरवाजा उघडला होता तीच्या डोळ्यात पाणी होते आईची खंत काय आहे ते मन आज बोलतं होते नकोस सोडुन जावु मजला मी काय तुला मागितले होते एक तु,तुझे प्रेम बाकी काय हवे होते

आईचा वाढदिवस || AAICHA VADHDIVAS || MARATHI || BIRTHDAY ||

" आई आज वाढदिवस तुझाय!" ति म्हणाली " माहितेय रे मला!' मग तुझ काहीतरी सांग ना!!" त्यावेळी ती सहज म्हणुन गेली, " हे सगळंच माझय रे!!" बोलायला काहीच उरलं नव्हतं.

मातृदिन || MATRUDIN || POEMS || MARATHI ||

शब्द नाहीत सांगायला आई शब्दात सर्वस्व माया , करुना, दया तुझी कित्येक रूप मझ घडविले तु हे संसार दाखविले तुझ सम जगात दुसरे न प्रतिरूप