आई बाबा

आई बाबा || Aai BABA

आई तुळशी समोरचा दिवा असते
बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
बाबा त्या रांगोळीतला रंग असतात

आई देवासमोर लावलेली निरांजन असते
बाबा त्याची ज्योत असतात

बाबा || BABA Thodas MANATL

वाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवणारे ते बाबा असतात. खरंच स्वतःला दिवसरात्र कामात गुंतवून आपल्या मुलांना आनंदात ठेवणारे ते बाबा असतात.

मन आईचे || Aaichya Manatl

असंख्य वेदनांचा त्रास होऊनही
सहन करणारी फक्त आईच असते

कधी सहज तर कधी कठोर वागणारी
मनास संस्कार देणारी आईच असते

बाबांची परी || BABANCHI PARI ||

बाबा म्हणारी ती राजकुमारी
एवढी लवकर का मोठी व्हावी
तिच्या आयुष्यात राजकुमार यावा
आणि या राजाची झोप का उडावी

कधीतरी जायचंच होतं तिला
ती वेळही आज लवकर का यावी
तिच्या सवे घालवलेल्या क्षणांची
तिने त्यास एक भेटच आणुन द्यावी