बहरून गेल्या फुलात, गंध दरवळून ते जावे !!
तुझ्या माझ्या नात्यात, जणू पहाट घेऊन यावे !!
कधी सावरावे तू, कधी सावरून मी घ्यावे !!
कधी बोलावे तू, कधी अबोल मी ऐकावे !!
बहरून गेल्या फुलात, गंध दरवळून ते जावे !!
तुझ्या माझ्या नात्यात, जणू पहाट घेऊन यावे !!
कधी सावरावे तू, कधी सावरून मी घ्यावे !!
कधी बोलावे तू, कधी अबोल मी ऐकावे !!
बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !!
हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !!
सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !!
प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!!
तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !!
शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !!
सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !!
ओढ जणू त्या भेटीची , मला तुझ्यात हरवून जाते !!
पाहते तुला उगा आठवात, जणू चिंब भिजून जाते !!
येता वाट ती वळणाची, त्या वाटेवरती थांबते !!
शोधते त्या गंधात तुला, पाना फुलांना बोलते !!
सोबत देते ती लेखणी , नकळत तुला सांगते !!
विरहात लिहिल्या शब्दांची, जणू कविता तेंव्हा होते !!
नकळत जेव्हा मज तु पहावे !! क्षणही ते तिथे रहावे !!
हरवून जावे सारे काही !! माझ्यात तेव्हा तूच उरावे !!
शब्दही ते जणू मिळावे !! अलगद त्या कवितेत लिहावे !!
कोरून ते नाव असे की!! प्रेम मनातले तुझं ते कळावे !!
बरसतात कित्येक सरी, चिंब मी भिजते !!
भिजल्या त्या मिठीत माझ्या, उगा तुला शोधते !!
सांग कसे समजावू मना, ना कोणा ऐकते !!
कोऱ्या कागदावर सहज ते , चित्र तुझे रेखाटते !!
सहज लिहावं, नी कविता व्हावी !!
कातरवेळी , जणू ती दिसावी !!
क्षणात माझ्या, मिठीत यावी !!
चारोळी ती, जणू पूर्ण व्हावी !!
सहज पहावं, नी प्रेमात पाडावी !!
सखी नजरेतून, मज का बोलावी !!
माझ्यातील मला, जणू ती मिळावी !!
उगाच का मग, कुठे ती शोधावी ??
साऱ्या नभात ती, रंग जणू उधळावी !!
साऱ्या आयुष्याची, साथ ती व्हावी !!
सावल्यात तेव्हा, कूठे ती शोधावी !!
सावली होऊन , हृदयात ती राहावी !!