दिनविशेष १५ नोव्हेंबर || Dinvishesh 15 November ||

दिनविशेष १५ नोव्हेंबर || Dinvishesh 15 November ||

१. झारखंड हे भारताचे २८वे राज्य तयार झाले. (२०००)
२. व्हेनेझुएला या देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९४५)
३. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (१९८९)
४. महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. (१९४९)
५. किंग सी. जिलेट यांनी आपल्या दाढी करण्याच्या जिलेट ब्लेडचे पेटंट केले. (१९०४)

दिनविशेष १४ नोव्हेंबर || Dinvishesh 14 November ||

दिनविशेष १४ नोव्हेंबर || Dinvishesh 14 November ||

१. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. (१९६९)
२. स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले. (१९७५)
३. गेल बॉर्डन यांना दुधाची भुकटी तयार करण्याच्या प्रक्रियेचे पेटंट मिळाले. (१८५६)
४. स्पेनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली. (१९२१)
५. दुसऱ्या महायुध्दात जर्मन वायुदलाने इंग्लंड मधील कोवेट्री शहरावर बॉम्बहल्ला केला. (१९४०)

दिनविशेष १३ नोव्हेंबर || Dinvishesh 13 November ||

दिनविशेष १३ नोव्हेंबर || Dinvishesh 13 November ||

१. रविंद्रनाथ टागोर यांना स्वीडिश ॲकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (१९१३)
२. ग्रीसने नवीन संविधान स्वीकारले. (१८६४)
३. इजिप्त मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन सुरू झाले. (१९३५)
४. फारूख लेघारी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९३)
५. पॅरिस मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १००हून अधिक लोक मारले गेले. (२०१५)

दिनविशेष १२ नोव्हेंबर || Dinvishesh 12 November ||

दिनविशेष १२ नोव्हेंबर || Dinvishesh 12 November ||

१. पहिल्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. (१९३०)
२. सुदान, ट्युनिशिया , मोरोक्को या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९५६)
३. स्पेनचे पंतप्रधान जोस कनलेजास वाय मेंडिस यांची हत्या करण्यात आली. (१९१२)
४. १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दीन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (२०००)
५. ऑस्ट्रिया प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९१८)