तुझे लाजणे !! ||BEst Marathi Poems || Kavita Sangrah || COUPLE IMAGES ||

“किती आठवांचा उगा अट्टाहास,
नव्याने तुला ते जणू पाहताच!!
सोबतीस यावी ही एकच मागणी,
तुझ्यासवे त्या जणू बोलतात !!

चांदणी ती पाहता तुला शोधणे,
रात्रीस त्या जणू हरवणे !!
चांदणे होऊन तू पसरून जावे,
त्या चंद्रास त्या जणू सांगतात !!

जशी छेडली ती तार क्षणांची !!
सूर जणू भेटले त्या सुरांशी !!
गीत होऊन ऐकत रहावे,
ही एकच मागणी जणू मागतात!!

शब्दही ही का प्रेम करत रहावे !!
तुझ्याचसाठी जणू ते सुचावे !!
अलगद त्या कागदावर लिहिताना,
कविता होऊन जणू बरसतात !!

सांगशील का तूच आज हे काही ??
आठवांचा हट्ट जणू जातं नाही !!
तेव्हा पाहून लाजणे तुझे असे की,
प्रेमात जणू तूझ्या पाडतात !!”

✍️ योगेश खजानदार

“ALL RIGHTS RESERVED”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *