"श्रीमंताची जात पैसा, गरिबाला जात काय ?? विचार थोड स्वतःस तू, इथे तुझं अस्तित्व काय ?? पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !! श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !! धाव तू , थांब तू , पण जायचं तुला कुठे हाय ?? श्रीमंताची शिवी गोड, गरीबाची मारकी गाय !! सांगू नकोस कोणास काही, सगळं इथं गुपित हाय!! जात , पात सगळं खोटं, पैसा हीच जात हाय !! स्वप्न अशी पाहू नको , जिथे तुला जायचं न्हाय !! श्रीमंताच्या गावी परका, गरिबीत जागा न्हाय !! फिरून फिरून यावं तिथंच, शोध काही संपणार न्हाय !! दोन जगात तुला कधी , अस्तित्व तुझं भेटणार न्हाय !! विचार एवढा करून शेवटी , हाती उत्तर मिळेल काय ?? पैश्याच्या या दुनियेत आज , माणूस नक्की कुठे हाय ??" ✍️ योगेश *ALL RIGHTS RESERVED*