Day: May 9, 2021

मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||

वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !!
हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !!
आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !!
घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !!

कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !!
महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!!
तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !!
घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!

दिनविशेष ९ मे || Dinvishesh 9 May ||

१. जगातले पहिले व्यंगचित्र द पेंनसिलवेनिया गॅझेटमध्ये जॉईन ऑर डाय या नावाने प्रकाशित झाले. हे व्यंगचित्र बेन फ्रँकलिन यांनी काढले होते (१७५४)
२. इटलीने ईथिओपियावर कब्जा केला. (१९३६)
३. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातृदिन साजरा करण्याचे जाहीर केला. (१९१४)
४. डॉ टाऊनले पेटन आणि डॉ जॉन मॅकलान यांनी जगातली पहिली नेत्रदान तसेच नेत्र प्रत्यारोपण साठीची बँक न्यू यॉर्क येथे सुरू केली. (१९४४)
५. जेकाॅब झुमा यांनी साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (२००९)