Skip to main content
grayscale photography of man praying on sidewalk with food in front

पैसा बोले!! पैसा चाले!!

man sitting at the side of the road leaning back on road railing near cars during daypensive handsome guy on stool in apartment
पैसा बोले!! पैसा चाले!!
"श्रीमंताची जात पैसा, गरिबाला जात काय ??
विचार थोड स्वतःस तू, इथे तुझं अस्तित्व काय ??

पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !!
श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !!

धाव तू , थांब तू , पण जायचं तुला कुठे हाय ??
श्रीमंताची शिवी गोड, गरीबाची मारकी गाय !!

सांगू नकोस कोणास काही, सगळं इथं गुपित हाय!!
जात , पात सगळं खोटं, पैसा हीच जात हाय !!

स्वप्न अशी पाहू नको , जिथे तुला जायचं न्हाय !!
श्रीमंताच्या गावी परका, गरिबीत जागा न्हाय !!

फिरून फिरून यावं तिथंच, शोध काही संपणार न्हाय !!
दोन जगात तुला कधी , अस्तित्व तुझं भेटणार न्हाय !!

विचार एवढा करून शेवटी , हाती उत्तर मिळेल काय ??
पैश्याच्या या दुनियेत आज , माणूस नक्की कुठे हाय ??"
✍️ योगेश


*ALL RIGHTS RESERVED*
indian rupee
Photo by Pixabay on Pexels.com

Yogesh khajandar

लेखक

2 thoughts to “पैसा बोले!! पैसा चाले!!”

Leave a Reply