मैत्री ..✍(friendship Day Special)

“हक्काने भांडावं असं
कोणीतरी हवं असतं
हक्काने बोलावं असं
कोणीतरी जवळ लागतं

कोणीतरी अलगद आपल्या
जीवनात तेव्हा येत असतं
मित्र असे त्या नात्यास
नाव ते मग देत असतं

दुःखात आपले अश्रू पुसायला
कायम ते सोबत असत
सुखात मात्र आनंदाने नाचायला
सर्वांच्याही पुढे असतं

एक नात मैत्रीचं हे
आयुष्य सार व्यापून टाकत असतं
कधी पावसात सोबती तर
कधी उन्हात सावली होत असतं

न राहवून आठवणीत
खूप काही बोलत असतं
लांब राहूनही हे नात
सतत साथ तेव्हा देत असतं..!!”

✍योगेश

2 comments

Leave a Reply