आजी आणि आजोबा !!

टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं.

आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करतात असच वाटत. आजोबापण खूप छान असतं हे तेच सांगतात आणि मनात असंख्य भावनांचा कल्लोळ होतो. ‘आजोबा’ अश्या कित्येक हाक कानावर पडतात आणि धावत येणार ते निरागस रोपट या वठलेल्या झाडास येऊन बिलगतं. घरात छोट्या पावलांनी फिरणार ते बाळ मला स्वतः सोबत घेऊन जात. अगदी राजा राणीच्या कथेथही, आणि मन अगदी पुन्हा माझ्याही बालपणात जातं.


या आजोबांना ही चिमुकली मंडळी सारी अगदी हवीहवीशी वाटतात. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोप येई पर्यंत आजोबा आणि आजी याच्या जगात हे रमून जातात. मनावर नकळत कित्येक संस्कार होतात आणि फुलणाऱ्या फुलास आजी आजोबा नावाचं हे प्रेमरूपी झाड का हवं असतं याचं उत्तर देवून जातात. आपली मुलं खूप मोठी झाली आणि त्यांचं बालपण आता तरुणपणात बदलून गेलं आणि या नातवाच्या रूपाने हे बालपण पुन्हा आपल्या भेटीस आल. सकाळच्या अगदी उठण्या पासून कित्येक संस्कार या चिमुकल्या मनावर करताना मी आता एक वडील नाही तर एक आजोबा आहे याची कुठेतरी जाणीव होते. ही जाणीव कदाचित मला माझ्यातील आजोबाला पुन्हा पुन्हा बोलायला भाग पाडते. इकडून तिकडे धावणारी ती छोटी पावले कदाचित माझ्यासारख्या थकलेल्या पावलास स्वतः सोबत धावायला लावतात पण शेवटी वय बोलत आणि थकलेल्या या हाताला त्याचा आधार मागतात. आधार कदाचित कधी थकलेल्या शरीराला नाही तर मनालाही मागतात. त्या छोट्या पावलांनी घरभर फिरताना या आजोबा आणि आजी भोवती फिरावं अस सतत वाटत राहतं.


हे म्हातारपण एकटं असल तर किती भयाण वाटत हे कधी कधी कळून जातं. एकांतात बसल्यावर कित्येक विचार येतात आणि या नातवाच्या कित्येक खोडकर गोष्टी आठवल्या की सारं काही विसरून जात. आजच्या काळाशी जुळवून घेताना कदाचित आमच्या सारख्या म्हाताऱ्यांची दमछाक होत असेलही पण या नव्या फुलांना कित्येक संस्कारांचा ठेवा द्यायचा आहे ही जाणीव मनात कुठे तरी असते. एक आजोबा किंवा एक आजी ही घरातली वयस्कर व्यक्तीचं नाही तर एक अनुभवी व्यक्तीही असते. आयुष्याच्या शर्यती मध्ये कुठेतरी गुंतल्यावर आपल्या मुलांस योग्य संस्कार झालेच पाहिजेत असे सगळ्याचं आई वडिलांना वाटत पण कदाचित घरातल्या गरजाच इतक्या असतात की वेळ कुठल्या कुठे निघून जाते कळतही नाही. अगदीच दूर जाऊन पहायची गरजही नाही.

आज आजोबापण कधी आणि कसे आले कळलेही नाही. कालपर्यंत एक वडील म्हणून भूमिका करताना कित्येक कठोर निर्णय मी घेतले पण आज एक आजोबा झाल्यावर कदाचित तो कठोरपण कुठेतरी राहून गेला आणि त्या नातवां सोबत आपणही पुन्हा लहान व्हावं अस वाटू लागलं आणि ते निरागस चेहरे या आजोबाला अगदी हसत हसत आपलस करून घेऊ लागले. कधी आम्ही कित्येक जुन्या दंतकथा मध्ये हरवून जावू लागलो, कधी नकळत कित्येक उत्तम संस्कार मी त्याच्यावर घडवू लागलो. मग कधी कधी वाटतं की इतकं सुंदर हे आजोबाच आणि नातवाच नात असताना कुठेतरी ते का विरून जात. वृद्धाश्रमात आपल्या म्हातारपणावर कुढत का बसावं लागत, तर कदाचित तिथे या नात्याला कधी मुक्त अस फुलूचं दिलं नाही अस वाटत.


प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात हे नक्कीच नात फुलू दिलं तर ते सुंदर फुलतं पण फुलयाच्या आधीच जर ते खुडून टाकलं तर कदाचित त्याचं सौंदर्य आपल्याला कळलंच नाही अस म्हणाव लागेल. आजच्या काळात सतत मोबाईल मध्ये डोकं घालून बसणारी लहान मुले कदाचित आजी आणि आजोबा या सुंदर नात्याला मुकतात हे तितकंच खर आहे. खरतरं त्यांना सांगावसं वाटत की बाळा त्यापेक्षा आपण सुंदर कथेतल्या एखाद्या राजकुमाराला भेटून येऊयात. पण सारच राहतं आणि आजी आणि आजोबा म्हणजे एक म्हातार माणूस एवढीच संकल्पना उरते.


आजी आणि आजोबा घरात असणारी घरं ही तितकीच सुंदर भासतात हे मात्र नक्की. आपल्याला या वयातही एकही आजार नाही यापेक्षा नातवाने आपल्याला आजोबा म्हणून मारलेली हाक सर्वात जास्त आनंद देऊन जाते यात तिळमात्र ही शंका नाही.त्याच्या दुडक्या पावलांनी घरभर केलेला दंगा कदाचित रेडिओ वर जुनी गाणी लागल्यावर होणाऱ्या आवजापेक्षा ही सुंदर वाटतात हे मात्र खरं. अगदीच अखेर सांगायचं तर आजी आणि आजोबा नावाचं सुंदर पान सर्वांच्याच आयुष्यात असावं हेही तितकंच खरं,

घरभर छोट्या पावलांनी
अगदी मनसोक्त फिरावं
माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच
दुसरं टोक त्यांनी धरावं

कधी द्यावा आधार म्हातारपणात
तर कधी कुशीत यावं
या म्हाताऱ्याला फक्त आता
आपलसं करून घ्यावं

होतील कित्येक संस्कार मनावर
आजोबांचं बोलणं त्यांनी ऐकावं
कधी राजकुमाराच्या कथेत
अगदीच हरवून जावं

चार क्षणाच हे म्हातारपण
थोड तू सांभाळून घ्यावं
निघून जाईल हा आजोबा तेव्हा
अश्रून मध्ये त्याला जपून ठेवावं

बस एवढीच ती अपेक्षा …!!! एका आजी आणि आजोबाची !!!

✍योगेश

Save This Poem

Leave a Reply