स्वप्नांच्या पलीकडे …!!

“स्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे

तुझ्या आठवणीच्या पडद्यावर
मनसोक्त एकदा फिरताना
झुळूक होऊन मला एकदा जायचं आहे

हरवून जाईल कधी ती सांज
ओल्या मनातील भावनेत
त्या भावनेतील ओल मला व्हायचं आहे

कधी एकांती, कधी तुझ्या सोबत
कधी अबोल, तर कधी खूप बोलत
तुझ्या गप्पांमध्ये मला हरवून जायचं आहे

ही दुनिया थोडी अतरंगी
तुझ्या आवडत्या रंगाने भरली
त्या रंगातील एक रंग मला बनायचं आहे

कधी दूर असेन ,कधी जवळ तुझ्या
साथ माझी असेल, कधी विरह असेन जरा
त्या विरहातील ओढ मला व्हायचं आहे

साथ तुझी द्यायला, सोबत माझी व्हायला
तुला आपलेसे करायला , मला तुझ्यात हरवून जायला
त्या घरात मला एकदा यायचं आहे..!!!”


✍ योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

2 thoughts to “स्वप्नांच्या पलीकडे …!!”

Leave a Reply