मन माझे…!!

Photo by Norexy art on Pexels.com

मन माझे …!!!

मन माझे आजही तुझेच गीत गाते
कधी त्या नजरेतून तुलाच पाहत राहाते
शोधते कधी मखमली स्पर्शात
तुझ्याचसाठी झुरते
मन वेडे आजही तुझीच वाट पाहते

कधी वाऱ्यास तुझाच मार्ग ते पुसते
कधी उगाच स्वतःस हरवून जाते
मनातल्या तुला आठवून
उगाच ते टिपूस गाळत राहते

भास तुझा आणि आभास कसा न कळते
तुझ्याच सोबत वेडे मन हे फिरते
जुन्या पानात, हरवलेल्या क्षणात
पुन्हा पुन्हा मन तुलाच पाहत राहते

ह्रुदयात फक्त नाव तुझेच असते
विसरावे म्हटले तरी पुन्हा पुन्हा ते आठवते
कधी पाहिले या हृदयात तरी
तुझ्याचसाठी ते जगते
हे प्रेम आजही तुझ्यावरच करते

सांग सखे तू अबोल आज का राहते
तुलाच बोलण्या हे वेडे मन सांगते
कधी त्या नजरेतून तुलाच पाहते
मन माझे आजही तुझेच गीत गाते..!!
-योगेश खजानदार

#मी_आणि_माझ्या_कविता

2 comments

Leave a Reply