एक तु

एक सांजवेळ आणि तु
गुलाबी किरणातील गोड भास तु
मंद वारा आणि झुळूक तू
मन माझे आणि विचार तु

मला न भेटावी की हरवतेस तु
मनास का एक आस तु
वेड्या जिवाची घालमेल आहेस तु
जणू माझ्यातील एक आहेस तु

पण कुठे आज हरवलीस तु
शोधूनही का सापडेना आज तु
नजर भिरभिरते आणि नजरेत तु
सांग एकदा कुठे आहेस तु

शब्दही आता बोलतात एक तु
कवितेत व्यक्त होताना जानवतेस तु
प्रत्येक ओळीत फक्त असतेस तु
वेडे बघ एकदा माझ्याकडे उरलीस फक्त तु!!!

-योगेश खजानदार

2 thoughts on “एक तु”

Leave a Reply