अंतर (भाग-३)

  • “नाती अबोल राहिली की अंतर वाढत जात, योगेश तु नेहमीच असा अबोल होऊन निघून गेलास आणि आपल नात नेहमीच अपूर्ण राहिल. माझ्या निर्णया नंतरही तु खूप उदास झालास. माझ्याशी बोलाच नाहीस.” प्रिया मनापासून योगेशला बोलत होती. “त्यावेळी काय बोलावं तेच कळेना. तुझ्या माझ्या मध्ये तुषार कधी आला तेच मला कळले नाही.” योगेश मनातल सांगत होता. “एकदा बोलायचं होतेस माझ्याशी!!” “त्यावेळी मला राग आला होता,काय बोलावं तेच कळेना!! बरं , तुषार कसा आहे आता?” योगेश एकदम बोलला. “तुषार आता नाहीये!! पुन्हा कधीच न भेटण्यासाठी तो निघून गेला!! प्रियाला पुढचे बोलवेना. योगेशला काय बोलावे तेच कळेना. तो थोडा अडखळला कित्येक शब्द ओठांवरच विरले. “आयुष्याच्या संध्याकाळी फक्त साथ मागितली त्याने मला!! आणि मला नाही म्हणता नाही आले रे योगेश!! प्रिया स्वतःला सावरत म्हणाली. “पण, पण हे कधी आणि कसे झाले?” “तुषारच माझ्यावर पहिल्यापासून प्रेम होते हे मला माहीत होते!! तो मित्र होताच पण आपल्या दोघांच्या नात्यात तिरहाईत म्हणूनच होता. हे मीही मान्य करते !! जेव्हा त्याला कळले की आपल्या आयुष्याची काहीच दिवस राहिले आहेत तेव्हा त्याने फक्त माझ्याकडे साथ मागितली!! पण या काळात त्याने फक्त माझ्यावर प्रेमच केलं!” प्रिया आता सगळं काही बोलत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रू मध्ये तुषार. “पण मी स्वताला हरवून गेलो प्रिया!! तुझ्या आणि तुषारच्या मध्ये मी येऊ नये म्हणून मी निघून गेलो!! पण तुषारच्या बद्दल जे झाले ते खरंच मला माहित न्हवते.” “म्हणूनच म्हटलं होत योगेश तुला मी!! की नात नीट नाहीना चाललं की refill बदलायची नात नाही बदलायच!!” “पण नात राहिलाच नाहीतर काय करायच?” “त्या नात्याला आयुष्यभर आपल्या मनात जपत राहायचं!! ” “आणि म्हणूनच तूषारच आणि तुझ नात आजही तु जपते आहेस तर!!” “हो!!कारण ते नात खूप सुंदर होत. तुषार माझ्या आयुष्यात आला पण जितक्या दिवस होता ते माझे सगळ्यात सुंदर दिवस होते.!!” “पण यामध्ये मला मी कुठेच दिसत नाही आता प्रिया!!!” योगेश अगदिक होऊन म्हणाला. “नात्यात अंतर वाढलं की माणूस फक्त स्वत:लाचं शोधतो योगेश तेही स्वतःहच्या मनात नाही. समोरच्या वक्तीच्या मनात!” कित्येक वेळ योगेश आणि प्रिया मनातल सगळं सांगत होते. आपण अबोल राहिलो म्हणून योगेशला वाईट वाटत होत. आणि आपल्या नात्यात पडलेलं हे अंतर मिटवण्याचे प्रियाचे प्रयत्न. यात coffee नक्कीच गोड झाली होती. “आईने तुला भेटायला पण बोलावलं आहे!! प्रिया अगदी सहज म्हणाली. “नक्की येईन!! कित्येक वर्ष झालीकाकूंना भेटलोच नाही!! “मग या रविवारी येशील??” “प्रयत्न करेन!!” “प्रयत्न नाही,यायलाच पाहिजेस!! मी वाट पाहीन तुझी. “ठीक आहे !! नक्की येतो. त्या भेटीत खूप काही मनाचा भार कमी झाला होता. प्रिया कित्येक दिवसनंतर मनमोकळेपणाने बोलली होती. काही नाती सहज तुटत नसतात. तर काही नाती अगदी सहज जोडली जात असतात. प्रिया आणि योगेशच हे अधुर नात पुन्हा एकदा बोलत होत. त्या रविवारची वाट पाहत होत. ती ओढ मनात प्रियाच्या आता वेड लावत होती. त्या दिवसापासून ती फक्त रविवारची वाट पाहत होती. योगेशला ही आता प्रियाला भेटायचं होत. आपण नक्कीच चुकलो अस त्याच मन बोलत होत. कुठेतरी त्याच्या मनातही एक तिच्यासाठी लिहिलेल्या ओळी आठवत होत्या, त्या जुन्या वहीच्या पानातून जणु तो सतत त्या गुणगुणत होता.. “सखे असे हे वेड मन का सैरावैरा फिरते तुझ्याचसाठी तुलाच पाहण्या अधीर होऊन बसते कधी मनाच्या फांदिवराती उगाच जाऊन बसते कधी आठवणीच्या गावाला त्या उगाच फिरून येते सखे असे हे वेडे मन का सैरावैरा फिरते !!! क्रमशः … -योगेश खजानदार

Published by

Yogesh khajandar

लेखक

2 thoughts on “अंतर (भाग-३)”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.