Skip to main content

मनाचा गुंता

“गुंतण म्हणजे काय असतं
स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं
अतुट अश्या बंधनात कधी
उगाच स्वतःला अडकवायच असतं

कोणाच्या प्रेमात पडायचं असतं
सुंदर आठवणीत झुरायच असतं
येताच येऊ नये बाहेर अश्या
नात्यांमध्ये रहायचं असतं

प्रत्येक क्षणात जगायचं असतं
मायेच्या कुशीत रमायचं असतं
ओढ अशी व्हावी या मनाची की
पुन्हा नात्यास भेटायचं असतं

धागा धागा विनायचं असतं
नजरेत भरुन वहायचं असतं
मनामध्ये मन मिसळून तेव्हा
आपलंस कोणी करायच असतं

वाटेवरती घुटमळायच असतं
वाट कोणाची तरी पहायच असतं
कळत नकळत तेव्हा उगाच
काळजी कोणाची तरी करायचं असतं

कारण,

गुंतण म्हणजे काय असतं तर
स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं!!!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

4 thoughts to “मनाचा गुंता”

Leave a Reply