बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!!

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय !!हाय काय!!
बार्शीचे खड्डे कसे खोल!! खोल!!
बार्शी तु आता तरी खरं बोल !! बोल!!
खड्डात गेली गाडी !! गाडी!!
बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!! हाय काय!!!
रस्त्याची दुरुस्ती कोण करी!!करी!!
रात्रीतून मूरुम कोणी भरी!! भरी
मुरूमात घसरली गाडी!! गाडी!!
बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!हाय काय!!
कित्येक जीवाची पर्वा इथे नाही!! नाही!!
खड्ड्यात रस्ता दिसत नाही!! नाही!!
तरीही कोणी ऐकत नाही! नाही!!
बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!! हाय काय!!
रोज किती अपघात इथे होती !! होती!!!
कित्येक जीव जखमी होती !! होती!!
बघुन लोक फक्त म्हणती !! म्हणती
बार्शीचा रस्ता लई भारी!!! भारी!!

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!! हाय काय!!

– योगेश खजानदार

4 thoughts on “बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!!”

Leave a Reply